जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचा “नीव” हा वार्षिक आनंदोत्सव दिमाखात साजरा

रंगमंचावर रंगली कलामैफल ; अविस्मरणीय कार्यक्रमाने भारावले सहकारी रसिक 

जळगाव, ता. २७ :  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयामध्ये सहका-यांसाठी एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अ‍ॅण्ड कल्चरल मिट म्हणजेच नीवहा वार्षिक आनंदोस्तव व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला. यावेळी नाटक, मिमिक्री, समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, बॉलिवूड थीम, फॅशन शो, काव्य वाचन, क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, बॅटमिंटन, संगीत खुर्ची, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इस्टीट्यूटमधील सहका-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा ताण कमी व्हावा आणि आपल्यातील विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल चार दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, बिजनेस मॅनेजमेंट, कनिष्ठ महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ३०० सहकाऱ्यांनी विविध कला प्रकारात सहभागी होऊन आयुष्याची नीव पुन्हा मजबूत केली. कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी रायसोनी इस्टीट्यूटच्या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पांचा आढावा घेत रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यामुळे रायसोनी इस्टीट्यूट सदैव यशोमार्गावरून वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला तसेच सहकारी आनंदात असतील तरच संस्थेचा विकास होईल. अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यातील कल्पकता व सृजनशीलतेला वाव देतात तसेच माहिती तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर सुरू असल्याने तत्परता, गती वाढली आहे, त्यासोबतच कर्मचाऱ्यांवर तणाव देखील वाढला आहे. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव व अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून तणाव कमी व्हावा, ‘खेळकर व तणाव मुक्त कर्मचारीही रायसोनी इस्टीट्युटची ओळख बनावी, अशी अपेक्षा आमच्या समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांची आहे, शिक्षण विभागात पूर्वीच्या तुलनेत सध्या काम वाढले असून नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व्हाट्सॲप, इमेलच्या वापरामुळे प्रत्येकाला तात्काळ प्रतिसाद देवून कामे मार्गी लावावी लागतात. अशावेळी एकत्रीकरण गेट-टुगेदर क्रीडा व कला गुण प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांनी या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आनंदोस्तव स्पर्धेतील विजयी स्पर्धकाची अनुक्रमे निवड करून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एचआर गणेश पाटील, प्रा. रफिक शेख, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील,  प्रा.जितेंद्र वडदकर, प्रा.जितेंद्र जमादार, प्रा.प्रमोद गोसावी, प्रा.तुषार वाघ, प्रा. नीलेश इंगळे, प्रा.योगिता पाटील, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.मुकेश अहिरराव, प्रा.मुकुंद पाटील, प्रा.रुपाली ढाके, प्रा.शितल जाधव, प्रा.सोनल पाटील, प्रा.प्राची जगवाणी, प्रा.डॉली मंधान, प्रा.अमोल जोशी, प्रा.पूजा नवाल, प्रा.कविता पाटील, प्रा.प्रियांका मल, अनिल सोनार, अजय चौधरी, शीतल जैन, बिमलेन्द्रू पात्रा आदींनी या कार्यक्रमाचे समन्वय साधले तसेच याप्रसंगी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी शिपाई व स्वच्छता कर्मचारी यांनी हा आनंदोस्तव आयोजित केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश