जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला “पतंग महोत्सव”

कुकिंग विदाउट फायर, पतंग बनवा व रांगोळी यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन, पतंगावर विविध सकारात्मक स्लोगन्स लिहून समाज प्रबोधन

जळगाव, ता. १५ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेट व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागातर्फे मकरसंक्रांतीच्या औचित्याने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पतंग महोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक पेहराव परिधान केला तसेच पतंगावर विविध सकारात्मक स्लोगन्स लिहून समाज प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व विविध विभागातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, पतंग महोत्सव सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि त्यातून समाज प्रबोधन करणे हि काळाची गरज आहे तसेच जीवनात मिळणारे यश, प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्यात समन्वय साधत पतंगासारखे आकाशात नव्हे तर जमिनीवर राहणे ज्याला जमते त्याला खरे यश मिळते, असाही विचार संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी शेकडो विद्यार्थ्यांसमोर मांडला. या कार्यक्रमात कुकिंग विदाउट फायर, पतंग बनवा व रांगोळी यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सेव्ह गर्ल चाईल्ड’, ‘मतदान करना, अच्छी सरकार चुनना, लोकतंत्र बचाना’, ‘नेता सुरक्षित-नारी असुरक्षित’, ‘मुलगा-मुलगी एक समान’, ‘मुलगी शिकली, प्रगती झालीआदी संदेश लिहिलेले पतंग स्पर्धेच्या निमित्ताने विध्यार्थ्यानी तयार केले होते. तसेच अनेक विध्यर्थ्यानी अनेकविध रांगोळी काढण्याचा आनंदहि घेतला व कुकिंग विदाउट फायर या स्पर्धेत विध्यार्थ्यानी कुठलेही पदार्थ न शिजवता चमचमीत व स्वादिष्ट असे पदार्थ तयार केले. या विविध स्पर्धेचे परीक्षण एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख व बिसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी केले. तसेच या उपक्रमासाठी प्रा. मानसी दुसे, प्रा. कविता इंगळे, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी यांनी समन्वय साधले. तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे

“पतंग बनवा स्पर्धा” – प्रथम: धनश्री जाधव, द्वितीय: चंदन शिंपी, तृतीय: लोकेश चौधरी

“रांगोळी स्पर्धा” - प्रथम: देवयानी प्रवीण पाटील, द्वितीय: वैष्णवी नितीन पाटील, तृतीय: खुशी मोतीराम तिवारी

“कुकिंग विदाउट फायर” – प्रथम: मामोनी मैती आणि सानिया आहुजा, द्वितीय: लोकेश तलरेजा, तृतीय: नुपूर जोशी

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश