जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ता. १२ व १३ रोजी “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप”वर राष्ट्रीय परिषद
जळगाव, ता. ९ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACIA), मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमाने ३ री इंटरनॅशनल कॉन्फरन्स “इनोव्हेशन टेक्नोलॉजी
अॅन्ड इंटर्नप्रणरशिप”या विषयावर आधारित, येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ
इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने ता. १२ व
१३ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे
आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेत शिक्षण विभागातून
प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनाही संशोधन सादर
करता येणार असून आयोजित परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात वक्ते प्रा.डॉ.
जनार्दन पौडेल, काठमांडू नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठचे निखिल
कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे
संचालक डॉ. राजेश जावळेकर, सहयोगी प्राध्यापक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रयोगशाळा
भारत सरकारचे प्रमुख प्रा.डॉ. संजय मंगला गोपाळ तसेच परिषदेच्या
प्रमुख संयोजीका व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती
अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत नवोपक्रम आणि उद्योजकता इनोव्हेशन, डिझाइन थिंकिंग, कौटुंबिक व्यवसाय
व्यवस्थापन, स्टार्ट-अपसाठी इकोसिस्टम, डिजिटल सोशल इनोव्हेशन, तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक मूल्य निर्मिती प्रकल्प व्यवस्थापन, मार्केट इनोव्हेशन, उत्पादन नवकल्पना आणि
विकास, डिजिटल मार्केटिंग, ब्रँड व्यवस्थापन यासह
विविध विषय हाताळले जाणार असून या परिषदेत एम.बी.ए विभाग व ई.कॉमर्स क्षेत्राशी
निगडीत संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संचालिका
प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्रा. डॉ. योगिता
पाटील यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. जितेंद्र जमादार, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. तन्मय भाले आदी
परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment