भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही : डॉ. संजय गोपाळ

स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीकनिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर राष्ट्रीय परिषद संपन्न ; संशोधक, नवउद्योजक व स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग 

जळगाव, ता.१२ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. १२ रोजी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपया विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश जावळेकर, स्टार्टअप इंडिया व नवउद्योजकांचे मेंटोर निखिल कुलकर्णी तसेच विनले पॉलीमरचे संचालक प्रमोद संचेती हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती देखील परिषदेत साजरी करण्यात आली. परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय विभागातर्फे या आठवड्यात (११ ते १७ जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे घेण्याचे ठरल्याने याच अनुषंगाने रायसोनी महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिपया प्रमुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी हि अकरावी परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे, जे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणर क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी यावर्षी एकूण ३४ कॉपीराइट्स व १५ पेटंट दाखल केल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरलेले होते. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर आभार प्रा. जितेंद्र जमादार यांनी मानले तसेच या परिषेदेचे समन्वय प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. सरोज पाटील, प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. तन्मय भाले, प्रा. रोहित साळुंखे, प्रा. कविता पाटील, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. श्रेया कोगटा, प्रा. डॉली मंधान यांनी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली साधले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

 

उद्घाटन कार्यक्रमातील मार्गदर्शन

लोकांच्या समस्या आणि त्यावर शोधलेला उपाय म्हणजेच बिझनेस” : निखिल कुलकर्णी

बंगळूर येथील मार्ग तसेच स्टार्टअप इंडियाचे व नवउद्योजकांना सतत मार्गदर्शन करणारे मेंटोर निखिल कुलकर्णी हे म्हटले कि, खरं म्हणजे बिझनेस आयडिया शोधण्यासाठी बाहेर कुठे जाण्याची फार गरज नाही. या शोधाची सुरूवात स्वत:पासूनच केली पाहिजे. थोडं निरिक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की दररोज अनेक साध्या-सोप्या गोष्टींसाठी आपल्याला झगडावं लागतं. तुमचं दररोजचं जगणं सोपं आणि सुखकर करण्यासाठी, म्हणजेच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ज्या गोष्टी आणि सेवा उपयोगी आहेत त्यापासूनच तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. लोकांसाठी असलेल्या समस्या आणि त्यावर तुम्ही शोधलेला उपाय म्हणजेच बिझनेस सुरू करण्यासाठीची उत्तम आयडिया. तसेच स्टार्ट अपसाठी कल्पकता, स्वत:वर विश्‍वास, दूरदृष्टी, मोठे होण्याची जिद्द आणि चांगले सहकारी एकत्र करण्याची कला लागते. अर्थात हे करताना कॅल्युलेटेड रिस्कही घ्यायलाच हवी. स्टार्ट अपही एक सुवर्णसंधीच आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

भारताची विज्ञान-तंत्रज्ञानात `परम` प्रगती : प्रा. डॉ. संजय गोपाळ

मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आपले अनुभव कथन करतांना सांगितले कि, स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे. तसेच आपल्याकडे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे असे सांगत त्यानी आपण आपली अस्मिता जपली पाहिजे म्हणजेच 'भारतीय' ही ओळख आपली 'प्रथम ओळख' असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

व्यावसायीकानो मागणी तसा पुरवठा करा : प्रमोद संचेती

विनले पॉलीमरचे संचालक प्रमोद संचेती यांनी तंत्रज्ञानात भारताने मोठी भरारी घेतली आहे. जगातील सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जोडीला काम करावे लागते. त्यामुळे अशा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माद्यमातून तंत्रज्ञान अभ्यासायला मिळते. तंत्रज्ञाचा अद्ययावत अभ्यास आपणास माहिती पाहिजे. तसेच आयुष्यात पुढे जायचे असेल तर आत्मविश्वास व संवाद कौशल्य, नेतृत्व विकास, समन्वयता, वैचारिक सकारात्मकता, वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे या गोष्टी विकसीत करणे गरजेचे आहे. तसेच विध्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले व व्यवसायकानी ग्राहकांच्या मागणीचा अंदाज ठेवून मागणी तसा पुरवठा करा व मार्केट रिसर्चर बना असे सांगितले.

 

गुणवत्ता वाढीसाठी जपानी तंत्रे वापरणे गरजेचे : डॉ. राजेश जावळेकर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश जावळेकर यांनी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले कि, भारत आणि जपान हे आशिया खंडातील दोन प्रमुख देश. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोन अणुबॉम्ब पडल्याने जपान बेचिराख झाला तर 1947 मध्ये भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था, कायदे व वाहतुकीचे मार्ग निर्माण करून ठेवले होते. तर अनेक कारखानेसुद्धा चालू झाले होते. त्याउलट जपानमध्ये सर्वच उध्वस्त झाले होते. परंतु जपानने पुढील 40 वर्षात आर्थिक महासत्ता बनण्यापर्यंत मजल मारली ती जपानी उद्योजकांच्या उध्योजकवृत्ती आणि जपानी कामगारांच्या दर्जेदार उत्पादन कौशल्यामुळे. याअनुषंगाने गुणवत्ता वाढीसाठी जपानी तंत्रांचा अभ्यास करून ती वापरणे अत्यंत गरजेचे आहे तसेच समस्या सोडवण्याचा दृष्टीकोन असला कि इनोव्हेशन येते कारण प्रत्येक इनोव्हेशनची सुरुवात हि समस्येने होते आणि त्याचा शेवट हा बिजनेसने होतो. म्हणजेच अंतर्प्रणरचा जो बेस आहे तो इनोव्हेशन आहे आणि या पुढे इनोव्हेशन व टेक्नोलॉजीची जे लोकं कास धरतील तेच भविष्यात यशस्वी मार्गक्रमण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राष्ट्रीय परिषदेतील मार्गदर्शकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या प्रसंगी डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी स्वामी विवेकानंदांचे आचार व विचारच या भारताला तारू शकतील व आजच्या भरकटलेल्या तरुणपिडीने स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन वाटचाल करावी तसेच सदृढ व सुसंस्कृत बलशाही भारत घडवावा, असे आवाहन केले. या वेळी कार्यक्रमाचे संयोजक व सर्व प्राध्यापक प्रध्यापकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य ग्रंथालयात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनीही स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन पाहण्यास जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थी, प्राध्यापक व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रंथपाल शीतल पाटील यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश