विद्यापीठीय विविध स्पर्धामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या तब्बल “१२” विध्यार्थी खेळाडूंची निवड
येणाऱ्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत करणार कबचौउमविचे प्रतिनिधित्व ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विध्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक जळगाव, ता. २९ : मागील पंधरा दिवसांमध्ये खानदेशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्रदीपक असे यश मिळवले. धुळे येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक महाविद्यालय या ठिकाणी १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मुलांच्या मल्लखांब स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर किशोर चौधरी याने विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तसेच आयएमआर महाविद्यालयात पार पडलेल्या (पुरुष गट) तलवारबाजी या क्रीडाप्रकारात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा विध्यार्थी कुणाल विलास भावसार या विध्यार्थ्याची निवड झाली असून तो संभाजीनगर येथील एम.जी.एम.विद्यापीठ ये...