जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा

 

जळगाव, ता. २६ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे नाताळ सण (ख्रिसमस) साजरा करण्यात आला. स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सांताक्लॉजचे मुखवटे, खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रभू येशूच्या जीवनावर नाटिका सादर केली. मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नाताळविषयी व प्रभू येशूचा महिमा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. सांताक्लॉजची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी जिंगल बेलवर ताल धरला. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. सांताक्लॉज, मदर मेरी, फादर जोसेफ, मेंढपाळ, परी अशी वेशभूषा मुलांनी केली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश