वक्तृत्व स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय “प्रथम”
जळगाव, ता.
२७ : नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून आयोजित
केलेल्या “आनंदयात्री डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे जिल्हास्तरीय वक्तृत्व
२०२३” स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक
संपादन केला आहे. जी. एच. रायसोनी सायन्स
अँड कॉमर्स महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला सुमित दीपक खैरे
या विद्यार्थ्याने या स्पर्धेत बाजी मारली. धांडे सभागृह, नंदिनीबाई कॉलेज
येथे १९ डिसेंबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘सोशल मिडियात
गुरफटलेली आजची तरुण पिढी’ या विषयावर चार मिनिटांच्या निर्धारित
वेळेत सुमित याने उत्स्फूर्तपणे भाषण करून परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत
जिल्ह्यातील असंख्य महाविद्यालये सहभागी झाली होती. जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व अँकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय
शेखावत यांनी सुमित दीपक खैरे याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment