जी. एच. रायसोनी महाविध्यालयात प्राध्यापकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिला “विकसित भारत @2047 : व्हॉइस ऑफ यूथ प्रोग्राम”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी नोंदवली या संवाद कार्यक्रमात उपस्थिती
जळगाव, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी 'Developed India@2047: Voice of Youth' या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाप्रमुख व प्राध्यापकांना संबोधित केले. त्याचवेळी हा कार्यक्रम फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह विविध वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले. त्याचा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्राध्यापकांनी हा कार्यक्रम संपूर्ण लाइव्ह पाहत पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यासहीत विविध विभागातील विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशाला विकसित राष्ट्र बनवणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवा. त्यासाठी देशभरात अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये युवकाना सहभागी होण्यासाठी परावृत्त करायचे असून देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा मार्गदर्शकांना आपण एकाच व्यासपीठावर एकत्र आणले आहे. व्यक्तींचा विकास करणे ही शैक्षणिक संस्थांची भूमिका असते आणि वैयक्तिक विकासातूनच राष्ट्र उभारणी होते. , भारताच्या इतिहासातील हाच काळ आहे जेव्हा देश एक क्वांटम जंप (जलद बदल) करणार आहे. अशा अनेक देशांची उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी ठराविक काळात अशीच क्वांटम जंप घेऊन स्वतःचा विकास केला आहे. आज भारत ज्या काळात अस्तित्वात आहे, त्या काळात व्यक्तिमत्व विकासाची मोहीम अत्यंत महत्त्वाची झाली असून व्हॉईस ऑफ युथ कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
Comments
Post a Comment