दैनंदिन वापरात ऊर्जेची बचत ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय शेखावत

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन” साजरा : मार्गदर्शकांचा एकवटला सूर

जळगाव,ता. १४ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बिपासा पात्रा यांनी केले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसाचे महत्त्व विशद करताना आजच्या परिस्थितीत ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच विविध ऊर्जा उपकरणे खरेदी करीत असताना ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या संकेतस्थळावर त्या उपकरणामध्ये होणारा विजेच्या खपत संदर्भातील माहिती तपासून नंतरच उपकरणे खरेदी करावीत. असा मोलाचा सल्ला याप्रसंगी प्रा.पात्रा यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिला. तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ऊर्जा संवर्धन व बचत आपल्यापासूनच सुरू करावे. असा निर्धार सर्व उपस्थितांनी याप्रसंगी करावा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जेची बचत तसेच वीज बिलात कमालीची घट करता येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी दैनंदिन वापरात ऊर्जेच्या बचतीचे विविध मार्ग याबाबत मार्गदर्शन करताना काही उदाहरणासह आपले विचार व्यक्त केले.  सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी हि उपयोगात आणू शकतो. यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे. तसेच सौर उर्जेची निर्मिती व वापर याबाबतीत आपल्या देशाने मागील एका दशकात मोठी प्रगती केली आहे व हि आगेकूच अशीच पुढे सुद्धा राहणार आहे. यातून पर्यावरण संवर्धन, आर्थिक व सामाजिक प्रगती तसेच शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्तीचे लक्ष पूर्ण करण्यास मदत होईल. असे मत याप्रसंगी प्रा. शेखावत यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे पोस्टर प्रदर्शनी व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीत विभागातील असंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेचे मूल्यांकन प्रा. प्रियंका गाजरे व प्रा. प्रतिक चिरमाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. मनीष महाले यांनी केले तसेच आभार विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बिपासा पात्रा यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विधार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश