जी. एच. रायसोनी महाविध्यालयात 'भारतीय ज्ञान परंपरा” यावर विचारमंथन

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत तज्ञाचे सखोल मार्गदर्शन ; राज्यस्तरीय परिसंवाद कार्यक्रमात असंख्य प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. २२ : नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने इंडियन नॉलेज सिस्टीमहा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळांपासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञानाविषयीची माहिती अंतर्भूत केली जाणार असून मंत्रालयाच्या बरोबरीने विद्यापीठ अनुदान आयोगाचाही या उपक्रमात समावेश आहे.

याच अनुषंगाने ता. २२ शुक्रवार रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात “'भारतीय ज्ञान परंपरा”  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यासपीठावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, गांधी रिसर्च फाऊडेशनचे असोसीएट रिसर्चर डॉ. अश्विन झाला, शिक्षण तज्ञ प्रा. डॉ विवेक काटदरे, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसंवाद कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर व मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच तीन/चार वर्षांच्या पदवीसाठी प्रथम वर्षाच्या-द्वितीय सत्रात भारतीय ज्ञान परंपराया विषयाचा दोन क्रेडिट अर्थात ३० तासांच्या अभ्यासक्रमाचा समावेश आमच्या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. मुळात अनेक प्राचीन भारतीय ऋषींनी आणि विद्वानांनी कित्येक शतकांपूर्वी प्रचंड प्रमाणात ज्ञाननिर्मिती करून ठेवली आहे. मौखिक परंपरा, हस्तलिखिते, पारंपरिक पद्धती, शिलालेख अशा विविध माध्यमांमध्ये ही निर्मिती करण्यात आली आहे. स्थापत्यशास्त्र, गणित, कृषी, पर्यावरण, खगोलशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये हे ज्ञान उपलब्ध आहे. शालेय धड्यांपासून ते उच्चशिक्षणापर्यंत विविध पातळ्यांवर आता हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. हे ज्ञान पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून प्राध्यापकांनाही प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले असून जी. एच. रायसोनी महाविध्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार इंडियन नॉलेज सिस्टीमबद्दल प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जात आहे. या पद्धतीमागील तत्त्वज्ञान, प्राथमिक ज्ञानसंपदा आणि संदर्भ प्राध्यापकांपर्यंत पोहोचविण्याचे काम येत्या काळात केले जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी आपल्या प्रस्ताविकेतून दिली. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक काटदरे यांनी नमूद केले कि, भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा व प्राचीन भारताचा इतिहास हा ज्ञानाचा वाहता झरा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला. भारतीय ज्ञानपरंपरेकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीला आलेले अवाजवी महत्त्व; एकेकाळची ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेबद्दलची उदासीनता; पाली, अर्धमागधी यांसारख्या भाषांचा झालेला ऱ्हास यामुळे अनेक विषयांमधले ज्ञानभांडार विस्मृतीच्या गर्तेत जात आहे. काही लेखकांनी लिहिलेल्या इंडियन नॉलेजवरील पुस्तकाच्या माध्यमातून अशा विस्मृत ज्ञानावर प्रकाश पडतो. स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जलव्यवस्थापन, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकला इत्यादी अनेक क्षेत्रांमधल्या भारतीयांच्या विलक्षण कामगिरीचे दाखले या पुस्तकामध्ये दिले आहेत. कुतुबमिनारजवळ बाराशे ते पंधराशे वर्षे न गंजता उभा असलेला लोहस्तंभ, १८०० वर्षांपासून वापरात असणारे कलानाई धरण, अदृश्य होणाऱ्या शाईमध्ये लिहिलेले अग्रसेन महाराजांचे चरित्र ही त्यापैकी काही उदाहरणे. सोमनाथ मंदिराजवळच्या किमान दीड हजार वर्षे जुन्या असणाऱ्या 'बाणस्तंभा'वर 'या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या सरळ रेषेला कुठेही अडथळा नाही' अशा अर्थाची संस्कृत ओळ कोरलेली आहे. आज तंत्रज्ञानाच्या साह्याने याची सत्यता पडताळता येते, तेव्हा इतक्या पूर्वी हे भौगोलिक ज्ञान भारतीयांकडे कसे आले याचे नवल वाटत राहते. सांकेतिक भाषेतल्या साहित्याबद्दलच्या पुस्तकातल्या माहितीचा आवर्जून उल्लेख करायला हवा असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यानंतर परिसंवाद कार्यक्रमातील दुसरे वक्ते डॉ. अश्विन झाला यांनी भारताने जगाला शून्याची देणगी दिली, आयुर्वेदासारखी निसर्ग केंद्रितआरोग्यप्रणाली दिली, प्राचीन धातुशास्त्राचा चमत्कार म्हणून प्रसिद्ध असलेला दिल्लीचा लोहस्तंभ, स्थापत्यशास्त्राचा अद्भुत चमत्कार म्हणून ज्याच्याकडे पाहावे लागेल असे आग्रा येथील ताजमहाल, अजंठा आणि वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी आणि अपौरुषेय असे चार वेद, अठरा पुराणे, उपनिषदे, षड्‌दर्शने, रामायण, महाभारतादी महाकाव्ये, चौदा विद्या, चौसष्ठ कला, ‘अस्तेय’, ‘ब्रह्मचर्यआणि अपरिग्रहाची शिकवण देणारा जैन धर्म, जडी-बुटी आणि पारंपरिक ज्ञानाधारे अशक्यप्राय व्याधींवर यशस्वी उपचार करणाऱ्या योग साधना, संगीत-नाट्य या सर्वांशी भारतीय कलापरंपरेत एकरूप होण्याची एक चांगली संधी इंडियन नॉलेज सिस्टीमया प्रकल्पाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना लाभेल तसेच गांधी विचारांचा वारसा आपल्याला लाभला असून शाश्वत विकासाचा समग्र विचार हाच भारतीय समाजकारणाचा कणा आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांनी भारत, संस्कृती आणि इतिहास हे तीन शब्द केवळ शब्द नाहीत तर प्रत्येक भारतीयाच्या भावना आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय परंपरेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करून विद्यार्थी केवळ आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगून वर्तमानकाळात संतुलित वर्तनाकडे वाटचाल करतील असे नाही तर भविष्याबद्दलही उत्साही होतील. तसेच बदलत्या सामाजिक वातावरणात आणि भारतीय मूल्यांमध्ये आपली शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक बनवणे अत्यावश्यक आहे. ही सर्वसमावेशक व्यवस्था प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा लक्षात घेतल्याशिवाय चालू शकत नाही, कारण एकीकडे आपण आधुनिकतेच्या युगात सरपटत चाललो आहोत, तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीत अंतर्भूत असलेली ज्ञान आणि वैज्ञानिक परंपरा विसरत चाललो आहोत असे त्यांनी यावेळी नमूद केले. या सदर परिसंवाद कार्यक्रमाचे समन्वय विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व बिबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी साधले तर आभार अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मानले.

 

पॅनल डिस्कशनमध्ये प्राध्यापकांचा एकवटला सूर

“'भारतीय ज्ञान परंपरा” या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमात सहभागी प्राध्यापकांसाठी पॅनल डिस्कशनचे देखील आयोजन करण्यात आले होते. या डिस्कशनमध्ये सहभागी सर्व प्राध्यापकांनी समस्यांची उकल तसेच शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संपूर्ण जगाला भारतीय ज्ञान उपयोगी ठरेल. हे ज्ञान आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालावी लागेल. त्यासाठी समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करावा लागेल, असा सुर या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांमध्ये एकवटला. या पॅनल डिस्कशनमध्ये गती अँकडमीचे संचालक देवदत्त गोखले, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार,  आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद गोसावी, एमसीए विभागप्रमुख रफिक शेख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील,  प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर, विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, बिबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील व प्रा. कविता पाटील यांनी सहभाग नोंदविला होता.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश