ऑफिसमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी कामासोबतच शिष्टाचाराचे ज्ञान असणे गरजेचे : राधिका सुब्रमन्यम
जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “ कॉर्पोरेट एनवायरनमेंट ” या विषयावर कार्यशाळा ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती जळगाव , ता ३१ : जेव्हा आपण व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून कॉर्पोरेट क्षेत्रात (नोकरीत) रुजू होतो तेव्हा नवीन कार्यालय आणि तिथे काम करणाऱ्या लोकांबद्दल आपण खूप उत्सुक असतो. आपण ऑफिसमधील वरिष्ठ , वातावरण आणि सुविधांबद्दल जाणून घेऊ इच्छितो. दरम्यान , ऑफिसमध्ये आपण कसे वागले पाहिजे हे आपण विसरून जातो. आपण आपले कपडे , शूज , केशरचना अगदी हँडबॅगकडे लक्ष देत नाही तसेच आपल्या वागण्याचा विचारही करत नाही. आपण आपल्या वर्तनाच्या बाजूकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. तुमच्या वागण्याने कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठांशी अशा प्रकारे वागावे की , प्रत्येकाला तुम्ही हवेहवेसे वाटायला हवेत असे मत गोदरेज बॉयस लिमिटेडच्या हेड ऑफ चॅनल मॅनेजमेंट राधिका सुब्रमन्यम यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्य...