जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीची हर्षाली माळी हि विद्यार्थीनी विद्यापीठातून बी. ई. परीक्षेत प्रथम
जळगाव, ता. १३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या बी. ई. (इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी) परीक्षेत जळगाव शहरातील सुपरिचित जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थीनी हर्षाली शरद माळी हिने ८९.२१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालयातीलच अमृता लहू पाटील या विद्यार्थिनीने ८८.३५ टक्के व बी. ई. (मेकॅनिकल) शाखेतून मानव प्रदीपकुमार कुकरेजा याने ८८.९२ टक्के मिळवत द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. बी. ई. परीक्षेत विद्यापीठात प्रथम व द्वितीय आल्याबद्दल यशस्वी विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले. तसेच संगणक, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सोनल पाटील व मेकॅनिकल विभागप्रमुख मुकुंद पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment