आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या धनश्री जाधव या विद्यार्थिनीची निवड
धनश्री जाधव या विध्यार्थिनीचे अभिनंदन करताना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, क्रीडा संचालक जयंत जाधव तसेच क्रीडाशिक्षक राहुल धुळणकर व ममता प्रजापत
जळगाव, ता. १७ : ओडीसा येथील के.आय.एस.एस. विद्यापीठ, भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या बी.टेक सिव्हिल द्वितीय वर्षाच्या धनश्री राजू जाधव या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. धनश्री जाधव हि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे भुवनेश्वर येथे होणाऱ्या जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असून ही स्पर्धा २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. धनश्री जाधव या विद्यार्थिनीला रायसोनी महाविध्यालयाचे क्रीडा संचालक जयंत जाधव तसेच क्रीडाशिक्षक राहुल धुळणकर व ममता प्रजापत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले .
Comments
Post a Comment