यशस्वी विध्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे होते : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
रायसोनी बिझनेस मेनेजमेंट महाविध्यालयात माजी विद्यार्थ्याचा मेळावा उत्साहात संपन्न, विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
जळगाव, ता. १७ : नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच आपण सकाळी लवकर घर सोडतो दिवसभर ऑफिसातच जातो. मग संध्याकाळी थकायला होतं. व्यायाम करायचा तरी कधी? व्यायामाला वेळच नाही.’ अशी तक्रार सर्रास सगळे करतात. पण तरुणानो, व्यायामासाठी वेळ काढायलाच हवा. त्यात हयगय करून चालणार नाही. अनेकांना फिटनेसची गरज असली, तरी कामाच्या गडबडीत फिटनेसाठी वेळ देता येत नाही त्यामुळे आता या वयातच फिटनेसची सवय लाऊन घ्या तसेच आपले छंद झोपासा तसेच खानदेशातील आपले पहिलेच मॅनेजमेट व अभियांत्रिकी ऑटोनॉमस महाविध्यालय असून नॅककडून रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला असून नॅक “ए” ग्रेडनेही आपले इस्टीट्यूट सन्मानित आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागातील विध्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मेनेजमेंट महाविद्यालयातील ‘नॉस्टेलजिया-२०२२’ या कार्यक्रमांतर्गत मॅनेजमेट व अभियांत्रिकी या शाखेतील पदवी व पदव्युत्तर शाखेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात केले. याप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी उपस्थित माजी विध्यार्थ्यांचे स्वागत करत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध यशस्वी कार्याची माहिती दिली तसेच भावी आयुष्यासाठी माजी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यावेळी म्हणाले की, व्हाॅटसअप, फेसबुकच्या जमान्यात अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन म्हणजेच स्नेहबंधनाचा मेळ होय. अशा मेळाव्याच्या माध्यमातून प्राध्यापक, विध्यार्थी व महाविध्यालय यांचे ऋणानुबंध नेहमीच टिकून राहतात. तसेच विध्यार्थ्यांच्या सध्याच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांबाबतीही विध्यार्थी प्राध्यापकांशी बोलून त्यावर तोडगा काढू शकतात त्यामुळे अशाप्रकारचे माजी विध्यार्थी मेळावे होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी रायसोनी महाविद्यालयातील म्युझिक क्लब च्या विध्यार्थ्यानी विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत. यावेळी एल्यूमनी फाउंडेशन समन्वयक तसेच प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.तन्मय भाले यांनी जी. एच. रायसोनी एल्यूमनी फाउंडेशनच्या विविध कार्यावर प्रकाश टाकत माझी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एल्यूमनी फाउंडेशन विविध कार्यक्रम राबवीत असल्याचे सांगितले तसेच इस्टीट्यूट व माजी विध्यार्थी कनेक्ट कसे राहतील यावरही सतत काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. योगिता पाटील, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. मयूर जाखेटे, प्रा. सौरभ गुप्ता, प्रा. मनीष महाले, प्रा. वसीम पटेल, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा.मोनाली शर्मा, प्राची जगवाणी, प्रा. रुपाली पाटील यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी विध्यार्थ्यांना रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
माजी विध्यार्थ्यानी व्यक्त केल्या
भावना
मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा
एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपले महाविध्यालय आता कसे
आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. वर्ग
मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी काहींनी
महाविध्यालयात मिळालेले शिक्षण व प्राध्यापकांनी दिलेले मूलमंत्र आपल्या जीवनात
किती उपयोगी येतात याचे सकारात्मक अनुभव कथन केले. तसेच योगिता पाटील, हर्शल
कुलकर्णी, स्वप्नील दुबे, सतस्वरूप तलरेजा, धिरज शिरोडे या माजी विध्यार्थ्यानी
रायसोनी मंडी, नेटवर्क लंच, पिनेकल या सारख्या उपक्रमातून आमचा
सर्वांगीण विकास होऊ शकला. त्याचप्रमाणे प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून नामवंत
कंपन्यामध्ये करियर घडविण्याची व उद्योजक होण्याची संधी मिळाली असे मत व्यक्त केले.
या माजी विध्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या बोर्ड ऑफ स्टडीज, अॅकडमिक कोंसील व आयक़्युएसी
विभागात नामांकन करण्यात येणार असून या माध्यमातून हे माजी विध्यार्थी सध्या
महाविद्यालयात शिकत असलेल्या विध्यार्थ्यांसाठी ३६० डिग्री डेव्हलपमेंटसाठी पुढाकार
घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच रायसोनी इस्टीट्यूटने या
मेळाव्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल विध्यार्थ्यानी संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांच्याजवळ आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment