जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक
जळगाव, ता. १२ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलचा सेव्ह अस इको अॅचिवर ऑर्गनायझेशन मुंबई आणि रोटरी क्लब
जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इको-अॅचिव्हर्स क़्विज या
प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असून अनया पलोड, हिमांशू रंगलानी व अद्वैत पाटील या जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.निसर्ग, प्राणीजीवन, त्यांचा अधिवास, वनस्पती, जैविक विविधता अशा विविध विषयांवर आधारित हि स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वी इयत्तेत शिकणार्या
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता येण्यासाठी तसेच आपल्या प्रदेशातील
जैविक विविधतेविषयी अभ्यास करण्यासाठी या क्विझचे आयोजन रोटरी क्लब जळगाव
वेस्टतर्फे करण्यात आले होते. यावेळी जवळपास शहरातील २२ स्कूलमधील १००
विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, आणि या स्पर्धेत जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा एकमेव संघ विजयी ठरला. हा संघ फेब्रुवारी महिन्यात
मुंबई येथे होण्यार्या भव्य मेगा फायनल मध्ये सहभागी होणार आहे. या दरम्यान विजयी
विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या
संचालिका सौ. राजुल रायसोनी तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन
लाभले. तसेच या यशामागे विध्यार्थ्यानी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व
शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त
झाले असे त्यांनी यावेळी नमूद केले. शालेय शिक्षणाबरोबरच, व्यक्तिमत्व विकास, विविध अॅक्टीव्हीटीलाही महत्त्वपूर्ण
स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक
गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी
पब्लिक स्कूलमधील विध्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment