हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है !
मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर यांचे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन
सुभाष तळेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले मुद्धे
१) टाईम मॅनेजमेंट
जेवणाचा डबा जेवणाच्या वेळेत पोहोचला
तरच त्याला महत्व आहे. मुसळधार पाऊस पडो, महापुर येवो किंवा महाभयंकर ट्रॅफिक जाम असो, डबेवाले कधीही लेट होत नाहीत.
ठरलेल्या वेळी ते डबा कलेक्ट करतील, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ते डबा पोहचवतीलच. कामातला हा चोखपणा त्यांची वेगळी ओळख निर्माण
करतो. डबावल्यांचे दिवसातले कामाचे तास म्हणजे फक्त सहा घंटे आहेत. पहील्या तीन
तासात ते घरातुन डबे जमा करतात. नंतरच्या तीन तासात ते ऑफीसातुन डबे घेऊन घरी वापस
देतात. कधीही, कसल्याही परिस्थीतीत डबेवाले आपल्या वेळेची मर्यादा तोडत नाहीत, म्हणुनच की काय एका टिफीनवर
सुरु झालेली ही सेवा आज दोन लाख डब्यांवर पोहोचली आहे. ह्यात खुप महत्वाचं सुत्र
दडलेलं आहे, “जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करु शकत
नसाल, तर तुमच्या आयुष्यात काहीही
मॅनेज करु शकत नाही.”
२) शिस्त
मुंबईचे डब्बेवाले स्वतःतर
शिस्त पाळतातच, त्यासोबत ग्राहकांनाही शिस्त लावतात. एखाद्या घरी डबा घेण्यासाठी
गेल्यास तो डबेवाला मोजुन चार मिनीटे डब्याची प्रतिक्षा करतो, आणि पाचव्या मिनीटाला तो घर सोडतो. त्यांच्या ह्या शिस्तीमुळे
ग्राहक आपापले डबे तयार ठेवुन त्यांची वाट बघतात. जे
ग्राहक वारंवार उशीर करतात, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात, आणि अशा कस्टमरला सेवा देणे डबेवाल्यांकडुन थांबवले जाते.
मुंबईच्या ट्रेनमध्ये डबे घेऊन जाणं आणि वापस आणणं अतिशय अवघड आहे, आपसुकच लोकांकडुनही डबेवाल्यांच्या ह्या शिस्तप्रियपणाचा मान राखला
जातो. शिस्त
असल्याचा अजुन एक फायदा आहे, हे लोक नेहमी व्यस्त असतात. जे लोक शिस्तीत जगतात, त्यांच्या जीवनात फालतुचे टेंशन नसतात, त्यांचं पुर्ण लक्ष त्यांच्या कामावर असतं. एकाग्रतेमुळे
उत्पादनक्षमता वाढते. शिस्तप्रिय लोकांचं समाजात कौतुक होतं. अशा लोकांवर, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला जातो.
३) निष्ठा
मागच्या एकशे तीस वर्षांपासुन फक्त आणि फक्त एकच काम. डबे
पोहचवण्याचं. संपुर्ण फोकस त्या एकाच कामावर. त्यामुळेच की काय, मुंबईचे डब्बेवाले हे
काम अतिशय उत्कृष्ट्पणे करत आहेत. कुठलाही धंदा तेव्हा अपयशी होतो, जेव्हा आपल्या मुळ
हेतुपासुन तो दुरावतो. काम सुरु करताना एक उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवलेला असतो, पण तो हेतु विसरताच, कामातला अनोखेपणा, विश्वासार्हता आणि
गुडविल हरवायला लागतं. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित
केल्यामुळे डबेवाल्यांची सेवा इतकी जलद आणि अनोखी बनलीय की त्यांचा सिक्स सिग्मा
सर्टिफिकेट देऊन गौरव केला गेला आहे.
४) कामावर प्रेम करा
बहुतांश डबेवाले हे वारकरी संप्रदायाला मानणारे असतात.
भुकेलेल्यांना अन्न पोहचवणे हे खरोखर पुण्यांचं काम! भक्तीभावाने ते हे काम
मनापासुन करतात, म्हणुन उन्हातान्हात काम करताना ते त्रासुन जात नाहीत, थंडी पावसात काम
करताना ते कुरकुरत नाहीत. खचाखच भरलेल्या लोकलचाही त्यांना त्रास होत नाही, कारण विठ्ठलाच्या
नामस्मरणातुन त्यांना उर्जा मिळते. डबा पोहचवणं, ही त्यांच्या लेखी एक
प्रकारची भक्ती आहे. म्हणुन सेवाभावाने ते काम आनंदाने करतात. आपल्या
प्रोफेशनबद्द्ल आपल्याला सन्मान असावा, आपलं आपल्या कामावर
मनापासुन प्रेम असावं, ते काम करताना वेळेचं
भानही जाणवु नये, पॅशनने केलेल्या कामात यश
मिळतचं मिळतं
५) टीमवर्क
दोन लाख डब्यांची देवाणघेवाण शक्य कशी होते, त्यासाठी प्रत्येक डब्यावर एक कोड असतो, तो इतका अवघडही नाही की नवख्या माणसाने गोंधळुन जावे पण तो इतका विशिष्ठ नक्कीच आहे, की डबा बरोबर ज्याचा त्याला मिळतो. प्रत्येक डबेवाला आपापल्या एरीयातले डबे एकत्र करतात आणि स्टेशनला पोहचवतात, काही मिनीटात त्या त्या कोडवरुन डब्यांची सॉर्टींग केली जाते, ज्या त्या भागातले डबे त्या त्या लोकलमध्ये ठराविक डबावाल्यांकडे दिले जातात, जो तो डबेवाला आपापल्या एरीयातले डबे घेऊन आपल्या एरीयात जातो, आणि डबे पोहचवतो. हा सारा प्रवास सायकलीवरुन आणि लोकलच्या डब्यांमधुन केला जातो. ह्या साखळीमध्ये टीमवर्कला अफलातुन महत्व आहे.
Comments
Post a Comment