Posts

Showing posts from February, 2022

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ब्लॉक चेन : युस केसेसवर कार्यशाळा

Image
आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जळगाव, ता.२८ : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र व विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सच्या अंतर्गत ब्लॉक चेन टेक्नोलॉजी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत ब्लॉक चेन नेटवर्क, पब्लिक ब्लॉक चेन, प्रायव्हेट ब्लॉक चेन, कन्सोर्ठीयम ब्लॉक चेन आणि हायब्रीड ब्लॉक चेन या विविध विषयावर एमरटेक इनोव्हेशन्सचे सीईओ गौरव सोमवंशी यांनी विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. हिरालाल सोळुंखे, प्रा. शुभांगी वाघवते, प्रा. प्रेमनारायण आर्या यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागाची विध्यार्थिनी शाहनवाज सय्यद, श्रुती बडगुजर यांनी केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी कौतु...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात ‘ड्रामा क्लब’चे उद्घाटन

Image
उद्घाटन कार्यक्रमाला लघुनाटिका सादर ; विध्यार्थ्यांना मिळणार नाटकाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन जळगाव, ता. २५ : आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावा म्हणून रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात ‘ड्रामा क्लब’ स्थापन करण्यात आला असून ता. २५ शुक्रवार रोजी महाविध्यालयाच्या प्रांगणात या क्लबचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच ड्रामा क्लबचे समन्वयक व जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील उपस्थित होते. रायसोनी इस्टीट्युट नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू होतोय असे मत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उद्घाटन कार्यक्रमाला व्यक्त केले. तसेच ड्रामा क्लबचे बापूसाहेब पाटील या...

रायसोनी महाविद्यालय विद्यापीठ स्तरीय आंतर महाविध्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

Image
फोटो केप्शन क्रीडा संचालक प्रा. संजय जाधव, प्रभारी प्राचार्य जे.व्ही.धनवीज, डॉ. पी. आर. चौधरी, प्रा. वाय. डी. देसले, डॉ. संजय चौधरी व विजेते विद्यार्थी जळगाव, दि २३ - येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले असून परीक्षित माळी, कार्तिक पाटील व श्रेयस अवतारे यांची बुद्धिबळ स्पर्धेत विभागीय संघासाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत एकूण ११ संघ सहभागी झाले होते.. नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धा श्रीमती प. क. कोटेचा महाविध्यालय भुसावळ येथे पार पडल्या यावेळी केतन बोरसे व श्रिनय नेवे या विद्यार्थ्यांचाही संघात समावेश होता. पुढील विभागीय स्पर्धा गोदावरी आयएमआर महाविद्यालयात होणार आहेत. स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा. रफिक शेख यांनी कौतुक केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. स...

प्रदूषण रोखण्यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात जनजागृती अभियान

Image
इलेक्ट्रॉनिक व्हेइकलचा वापर, रॅली व पथनाट्य सादर करत केली जनजागृती जळगाव, ता. २० : सध्या जळगाव शहरात धुळीने व हवेच्या प्रदूषणाने अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. याच बाबीचा अंदाज घेत जळगाव शहरातील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या विध्यार्थ्यानी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. महाविध्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी काही दिवसांपासून प्रदूषण रोखण्यासाठी ‘युद्ध प्रदूषण के विरुद्ध’ हे अभियान सुरू केलं आहे. याअंतर्गत धुळीविरुद्ध अभियान सुरू करणं, वृक्षांची लागवड, प्लास्टिकचा वापर टाळणे, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसी लागू करणं व शेतीतील पालापाचोळा जाळण्याऐवजी जैव विघटनाचं तंत्रज्ञान (Bio Decomposer Technique) वापरणं याचा समावेश आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात करत विध्यार्थ्यानी प्रदूषण मुक्तीचे फलक हातात घेत शिरसोली ते जळगाव या रस्त्यावर रॅली काढली तसेच प्रदूषण मुक्ती संदर्भातील पथनाट्य सादर केले व यावेळी वृक्ष लागवड देखील करण्यात आली. या विध्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सिद्धार्थ पांडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या अभिया...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात शिवजयंती साजरी

Image
जळगाव, ता. १९ : रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ता. १९ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता प्रशासन विभागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री. प्रकाश शर्मा, प्रा. गणेश पाटील, रजिस्टार अरुण पाटील, स्टोर इन्चार्ज अजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश उपासनी, चंद्रकांत ढाकणे, महेंद्र ढोणे, आसिफ पिजारी, पवन अस्वार, कमलाकर सोनावणे, योगेश गनुरकर, राहुल कापडणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार उत्पन्न करा ; डॉ. संदीप वानखेडे

Image
रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती जळगाव, ता. १८ : भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत जो शिक्षणक्रम मनापासून आवडतो त्यातच आपले करिअर करा व केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुद्धा तितकाच मानसन्मान देणारा व अर्थप्राप्ती देणारा असतो याची सुद्धा जाणीव ठेवा असे भावनिक आवाहन पुणे येथील ऑल इंडिया शिवाजी स्मारक सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्रा. डॉ. संदीप वानखेडे यांनी ता. १८ शुक्रवार रोजी शहरातील सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात केले. महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिल तर्फे ट्रीज बेस्ड सेशन ऑन प्रॉब्लेम सोल्विंग अॅन्ड आयडीएशन वर्कशॉप शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते. डॉ. चरखा यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, मनुष्यबळ विकास करण्याचे काम गेली अनेक वर्ष रायसोनी इस्टीट्युट करत असून संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज अभियांत्रिकी क्षेत्रामधील नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच...

रायसोनी महाविध्यालयात ‘फॅब्रिकेशन क्लब’चे उदघाटन

Image
टाकाऊ पासून, योग्य रस्ता दाखविणाऱ्या आर्टीफिशीअल घुबडाची निर्मिती ; क्लबमध्ये विध्यार्थी बनविणार ‘टाकाऊ पासून विविध टिकाऊ वस्तू’ जळगाव, ता. १७ : कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणा‍‍ऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपले घर, परिसर, महाविध्यालय किंवा विविध भागातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणा‍‍ऱ्या कच‍ऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. त्यामुळे कच‍ऱ्यात जाणा‍ऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल व कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन असा उद्देश समोर ठेवत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागातर्फे फॅब्रिकेशन क्लबचे उद्घाटन करण्यात आले आहे. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने, दर्जेदार शिक्षण कसे देता येईल व त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा प्रामुख्याने विचार करत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये फॅब्रिकेशन क्लबची स्थ...

रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची सभा

Image
बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले मार्गदर्शन ; सभेला जिल्हाभरातील प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, परिरक्षक व शिक्षकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती जळगाव, ता. १६ : कोरोना प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता बारावीच्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी ता. १६ बुधवार रोजी शहरातील सुपरिचित रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात केले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी, जळगाव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, विकास अधिकारी दिपाली पाटील, सुपरवायजर विभागीय मंडळ रमेश गोसावी हे उपस्थित...

प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
रायसोनी महाविध्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल जळगाव, ता. १४ : शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि महाविद्यालयाची वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांची उपस्थिती होती. डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी महाविद्यालयापासून आणि शिक्षणापासून दुरावत चालला असताना महाविद्यालयाने विविध शैक्षणिक उपक्रम राबव...

विध्यार्थ्यानो, अपारंपरिक उर्जेच्या स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन द्या : प्रा. महेश खवरखे

Image
रायसोनी महाविध्यालयात विद्युत शाखेच्या विध्यार्थ्यांसाठी कार्यशाळा ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना सर्टिफिइड सोलर ट्रेनर महेश खवरखे जळगाव, ता. १३ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने मागील शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे शिक्षण देता येईल याचाच प्रामुख्याने विचार केला आहे. याच उपक्रमांतर्गत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याला विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता या अनुषंगाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाने "इमेर्जिंग ट्रेंड्स इन सोलर फोटोवोल्टीक" या विषयावर कार्यशाळा आयोजीत केली होती. या कार्यशाळेत सर्टिफिइड सोलर ट्रेनर महेश खवरखे यांनी विध्यार्थ्यांना सौर ऊर्जा संयंत्र बद्दल माहिती दिली, त्यांनी आपल्या मनोगतात न...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात दहा दिवसीय अ‍ॅप्टिट्यूड ट्रेनीग

Image
फोटो ओळ : सहभागाचे प्रमाणपत्र वाटप करतांना प्रा. प्रिया टेकवानी जळगाव, ता. ११ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग व ब्राकलेस जीटीटी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने दहा दिवसीय अॅपटीट्युड ट्रेनीग घेण्यात आली. या ट्रेनीगमध्ये विध्यार्थ्यांना सामाजिक शिष्टाचार, टाईम मॅनेजमेंट, नफा–तोटा, दिशा आणि अंतर, ब्लड रिलेशन, संभाव्यता, स्पीड-टाईम, ताण व्यवस्थापन, संख्या मालिका, वेळ आणि काम, मुलाखत कौशल्य, देहबोली, पजल्स, सामाजिक माहिती, सामान्य ज्ञान आदि विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत अॅब्रिडक्रॉपचे ट्रेनर कुशल लखानी, हार्दीका लखानी, निशांत ठाकरे, मनीष हाटे यांनी मार्गदर्शन केले तसेच या दहा दिवसीय कार्यशाळेत ३०० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता, सहभागींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रा. प्रिया टेकवानी यांनी सहकार्य केले तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन ...

सुखी, आनंदी जीवनासाठी वाचा गीतेतील उपदेश : जान्हवी देवी दासी

Image
रायसोनी महाविध्यालयातील बुक रिव्हू क्लब तर्फे “श्रीमद भगवतगीता या पुस्तकाचा परिचय” जळगाव, ता. १० : हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त आहेत असे मत सिंगापूर येथील व जगभरात श्रीमद भगवतगीतेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या जान्हवी देवी दासी यांनी व्यक्त केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील बिजनेस मॅनेजमेट विभागांतर्गत "लाईफ लेसन फ्रॉम भगवतगीता" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंगापूर येथील जान्हवी देवी दासी, रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, बुक रिव्हू क्लबच्या समन्वयिका प्रा. ज्योती जाखेटे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात जान्हवी देवी दासी पुढे म्हणाल्या कि, भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांची नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

Image
जळगाव प्रतिनिधी ,  ता.  ९  :   शहरातील जी.   एच.   रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस म ॅ नेजमेंट महाविदयालयाच्या   ट्रेनिंग   अ‍ॅण् ड   प्लेसमेंट   विभाग   उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. याच अनुषंगाने   कॉम्प्युटर क्षेत्रातील  “L&T  टेक्नोलॉजी सर्व्हिसेस ली. ” , “ एॅटोस ग्लोबल ” व “फेस कंपनी”    या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस   मॅनेजमेट   महाविद्यालयाती ल   १८   विद्यार्थ्यांची   कॅम्पस   इं टरव्युवद्वारे   निवड   करण्यात   आली   आहे.     अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या   संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल  यांनी दिली.   “L   &   T  टेक्नोलॉजी सर्व्हिसेस ली. ” , “ एॅटोस ग्लोबल ” व “फेस कंपनी”  या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या   निवड ...

रायसोनी महाविध्यालयातर्फे स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Image
फोटो ओळ  :   भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,  अकॅडमिक डीन   प्रा. डॉ.   प्रणव   चरखा  यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी जळगाव, ता. ७ : ज्येष्ठ गायिका व भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना रायसोनी महाविध्यालयातर्फे सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. बिजनेस मॅनेजमेंट विभागाच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लता मंगेशकर यांची गाणी सुरू ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन   प्रा. डॉ.   प्रणव   चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि , ‘‘ प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की , सकाळी उठल्यावर देवाची आरती ,   मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत ग...

युवकानो, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा : प्रा. राहुल त्रिवेदी

Image
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात एमबीए प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी चार दिवसीय कार्यशाळा जळगाव, ता. ३ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने मागील शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे शिक्षण देता येईल याचाच प्रामुख्याने विचार केला आहे. याच उपक्रमांतर्गत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याला विद्यार्थ्यांचा , प्राध्यापकांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता. सदर उपक्रमाला मिळालेली प्रचंड यशस्विता पाहून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या यशस्वी करिअरसाठी तसेच त्यांच्यात कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक बदल व्हावेत यासाठी महाविद्यालयात चार दिवसीय विविध क्षेत्रातील एक्स्पर्ट त्यांना मार्गदर्शन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याच उपक्रमांतर्गत या वर्षी डेल कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी एमबीए प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चार दिवसीय...

रायसोनी महाविध्यालयाचे प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांचे पुस्तक प्रकाशित

Image
पुस्तकात उद्योग व शेतीसह सर्वच स्तरातील अभ्यासपूर्ण माहिती ; संचालक श्री. प्रितम रायसोनी व प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यासह सर्व स्तरातून डॉ. रजक यांचे कौतुक फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील   प्रा .  डॉ. दिपेन कुमार   रजक यांचे पुस्तक प्रकाशित करतांना   रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व   अकॅडमिक डीन   प्रा. डॉ.   प्रणव   चरखा जळगाव , ता. १ :   रायसोनी बिजनेस मॅनेजमेट   महाविद्यालयातील   मॅकेनिकल अभियांत्रिकी   विभाग प्रमुख   प्रा. डॉ. दिपेन   कुमार   रजक   यांनी लेखन केलेल्या   ' नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर रेनफोर्स कंपोजिट्स   '  या पुस्तकाचे प्रकाशन ता. ३१ सोमवार रोजी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व   अकॅडमिक डीन   प्रा. डॉ.   प्रणव   चरखा   यांच्या हस्ते करण्यात आले.   अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्या...