रायसोनी महाविध्यालयाचे प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांचे पुस्तक प्रकाशित

पुस्तकात उद्योग व शेतीसह सर्वच स्तरातील अभ्यासपूर्ण माहिती ; संचालक श्री. प्रितम रायसोनी व प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यासह सर्व स्तरातून डॉ. रजक यांचे कौतुक

फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील प्राडॉ. दिपेन कुमार रजक यांचे पुस्तक प्रकाशित करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा

जळगाव, ता. १ : रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी लेखन केलेल्या 'नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर रेनफोर्स कंपोजिट्स या पुस्तकाचे प्रकाशन ता. ३१ सोमवार रोजी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार डॉ. प्रिती अग्रवाल यांनी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतातकालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे याचाच मागोवा घेवून प्राडॉ. दिपेन कुमार रजक यांनी लिहिलेले हे पुस्तक विध्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राडॉ. दिपेन कुमार रजक यांनी पुस्तकाची माहिती देतांना सांगितले कि, एफआरपी कंपोझिटच्या क्षेत्रात माझे स्वलिखित पुस्तक प्रकाशित झाले आहे त्यामुळे मला विश्वास आहे की “नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर रेनफोर्स कंपोजिट्स” हे पुस्तक शास्त्रज्ञअभियंतेशैक्षणिक कर्मचारी आणि नैसर्गिक आणि संश्लेषण प्रबलित पॉलिमर आणि कंपोझिटच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश