नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार उत्पन्न करा ; डॉ. संदीप वानखेडे

रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती
जळगाव, ता. १८ : भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत जो शिक्षणक्रम मनापासून आवडतो त्यातच आपले करिअर करा व केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुद्धा तितकाच मानसन्मान देणारा व अर्थप्राप्ती देणारा असतो याची सुद्धा जाणीव ठेवा असे भावनिक आवाहन पुणे येथील ऑल इंडिया शिवाजी स्मारक सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्रा. डॉ. संदीप वानखेडे यांनी ता. १८ शुक्रवार रोजी शहरातील सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात केले. महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिल तर्फे ट्रीज बेस्ड सेशन ऑन प्रॉब्लेम सोल्विंग अॅन्ड आयडीएशन वर्कशॉप शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते. डॉ. चरखा यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, मनुष्यबळ विकास करण्याचे काम गेली अनेक वर्ष रायसोनी इस्टीट्युट करत असून संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज अभियांत्रिकी क्षेत्रामधील नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच हि कार्यशाळा नक्कीच विध्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळवून देणारी ठरेल यावेळी त्यांनी रायसोनी इन्स्टिटयूटच्या विविध अभ्यासक्रमांबाबतही माहिती दिली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. संदीप वानखेडे यांनी पुढे म्हटले कि, कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करताना पुरेपूर झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम याकडे ही लक्ष देणे गरजेचे असून मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये ही वेळोवेळी सहभाग घेत चला तुम्हाला निश्चित यश मिळेल असा यशाचा कानमंत्रच डॉ. संदीप वानखेडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे समन्वय व सुत्रसंचालन महाविदयालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिलचे समन्वयक प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांनी केले, तर महाविदयालयाच्या प्रा. स्वाती सोनार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश