रायसोनी महाविध्यालयातर्फे स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

फोटो ओळ  : भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी

जळगाव, ता. ७ : ज्येष्ठ गायिका भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना रायसोनी महाविध्यालयातर्फे सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. बिजनेस मॅनेजमेंट विभागाच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लता मंगेशकर यांची गाणी सुरू ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि, ‘‘प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की, सकाळी उठल्यावर देवाची आरती,  मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत गायले. तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले कि, ‘‘संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला. त्यांच्या सुरांमधून येणाऱ्या आठवणी युगानुयुगे कायम राहतील. सदर कार्यक्रमासाठी रायसोनी इस्टीट्युटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील व प्रा. राहुल त्रिवेदी यांनी सहकार्य केले. तसेच श्रद्धांजली कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश