जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून रंगला “नवरात्र” उत्सव
पारंपारिक वेशभूषेत गरब्याच्या ठेक्यावर थिरकले विद्यार्थी व पालक ; उत्साह , जल्लोष आणि विजेत्यांचा गौरव जळगाव , ता. २९ : शहरालगत असलेल्या सावखेडा शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडिया नृत्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी , पालक , शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम रंगतदार केला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. यंदा नवरात्रोत्सवानिमित्त शाळेत दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह पालकांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनीही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह गरब्याच्या ठेक्यावर ताल धरून उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला. स्पर्धेत सहभागी पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायस...