जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयात “ओझोन दिन” साजरा
कार्यक्रमाची
सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख उपस्थितांनी ओझोन थराचे महत्त्व
अधोरेखित करणारे विचार मांडले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. विनय पाटील यांनी आपल्या
उद्बोधक भाषणात सांगितले की, “ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणात
असलेले एक अत्यंत महत्त्वाचे संरक्षणात्मक आवरण आहे. सध्याच्या काळात औद्योगिकीकरण, प्रदूषण आणि
मानवी हस्तक्षेपामुळे यामध्ये घट होत चालली आहे, जी भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही
जीवनशैली अंगीकारण्याचे आणि जनजागृतीसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
यानंतर
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी ओझोन थराचे महत्त्व, त्याचे
होणारे नुकसान आणि त्याच्या संरक्षणाची आवश्यकता यावर अत्यंत मार्मिक आणि
वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “ओझोन थर पृथ्वीवरील जीवनासाठी
एक सुरक्षाकवच आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा हा थर
नैसर्गिक संतुलनासाठी अत्यावश्यक आहे. परंतु मानवी कृतीमुळे तो धोक्यात आला आहे.
आपण सर्वांनी मिळून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आणि जनजागृती करणे ही काळाची
गरज आहे.”
या
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच पर्यावरण विषयक घोषणांनी वातावरण जागरूकतेने भारून
टाकले. शेवटी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून ओझोन संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष
कृतीतून दिला गेला.
प्रा. विनय
पाटील व प्राचार्या प्रा. सोनाल तिवारी यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि
मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ झाली.
यावेळी
कार्यक्रमासाठी प्रा. राहुल यादव व प्रा. संदीप पाटील यांनी समन्वयकाची भूमिका
अत्यंत नेटकेपणाने बजावली. तर प्रा. नैना चौधरी, प्रा. प्रियंका मल, प्रा.निकिता
कौरानी, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. अभिषेक सुरैया, प्रा. नेहा लुनिया, प्रा.
मीनाक्षी पाटील, अनिल सोनार
आणि संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले.

Comments
Post a Comment