पर्यावरणपूरक भविष्यासाठी : जी. एच. रायसोनीत शाश्वत बांधकामाच्या अत्याधुनिक “सेंटर ऑफ एक्सीलन्स”ची स्थापना

“अल्ट्राटेक”च्या सहकार्याने सिव्हिल अभियांत्रिकी आणि टिकाऊ बांधकाम संशोधनाला नवी दिशा ; करिअर आणि रिसर्चसाठी नवा मंच मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

जळगाव, ता. २४ :  येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्यात ऐतिहासिक एमओयू  करण्यात आला. या करारानुसार, कॉलेज कॅम्पसमध्ये एक अत्याधुनिक “सेंटर ऑफ एक्सीलन्स इन सस्टेनेबिलिटी अँड ग्रीन बिल्डिंग मटेरियल्स”ची स्थापना करण्यात आली. या केंद्राचा उद्देश सिव्हिल अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स, कॉक्रीट टेक्नॉलॉजी तसेच पर्यावरणपूरक-टिकाऊ आणि शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान या क्षेत्रांत नवे संशोधन आणि कौशल्यविकास घडवून आणणे हा आहे.

या केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात व्यासपीठावर अरिहंत डेव्हलपर्स व क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. अनिशजी शहा व अल्ट्राटेक सिमेंटचे झोनल हेड श्री. अरविंद महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एरिया सेल हेड श्री. सुनील मिसाळ, रिजनल हेड बाळकृष्ण कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी महाविध्यालय वर्षभर विविध उपक्रम राबवीत असते याचाच एक भाग म्हणून स्थापत्य अभियांत्रिकी विभागात अत्याधुनिक “सेंटर ऑफ एक्सीलन्स”ची स्थापना करण्यात आली. या सेंटर ऑफ एक्सीलन्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या संधी प्रदान करणे, तसेच त्यांना उद्योगाच्या व्यावसायिक ज्ञानाशी जोडणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रगल्भ शोध, प्रोजेक्ट्स आणि इंडस्ट्री रिलेटेड कौशल्ये मिळवता येणार आहेत, जे त्यांना भविष्यातील उद्योगासाठी अधिक सक्षम बनवतील. यामुळे महाविद्यालयाच्या संशोधन वातावरणात नवचैतन्याचा संचार होईल आणि विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व कार्यशाळा देखील आयोजित केली जातील. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. अनिशजी शहा यांनी म्हटले कि, जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचा हा उपक्रम शिक्षणक्षेत्र आणि उद्योगजगत यांच्यातील भक्कम सेतू  ठरणार आहे. आगामी काळात हे केंद्र विद्यार्थ्यांना रिसर्च, इनोव्हेशन आणि इंडस्ट्रीशी थेट जोडणारे महत्त्वाचे हब बनेल. यामुळे उत्तर महाराष्ट्र विभागातील सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्राची ताकद अधिक वृद्धिंगत होईल. तसेच आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच तंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे म्हणजेच आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या प्रवाहासोबत जुडवून घ्यावे असे मत व्यक्त करत त्यांनी महाविद्यालयातील “सेंटर ऑफ एक्सीलन्स”या उपक्रमाचे कौतुक करत या सेंटरमध्ये विकसित होणारे प्रकल्प आणि संशोधन कार्य सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टिकाऊ बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित असतील. आणि याचा निश्चितच भविष्यात फायदा होईल असे सांगितले.

यानंतर श्री. अरविंद महाजन यांनी या कराराला शिक्षणसंस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील आदर्श भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणत, अल्ट्राटेक सिमेंटचे संशोधन आणि शाश्वत विकास हेच भविष्यकालीन बांधकामाचे आधारस्तंभ आहेत. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव, मेंटरशिप आणि टिकाऊ तंत्रज्ञानाशी जोडण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचा रोजगारक्षमतेत मोठी वाढ होईल या उपक्रमामुळे महाविद्यालयाचे संशोधन वातावरण आणखी समृद्ध होईल. विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर उद्योगासाठी तयार नेतृत्वकर्ते म्हणून घडतील. तसेच या ऐतिहासिक भागीदारीमुळे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे स्थान, संशोधन, टिकाऊ बांधकाम आणि ग्रीन टेक्नॉलॉजी क्षेत्रात आणखी मजबूत होणार असून, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या संधींचे नवे दालन खुले झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आभार प्रदर्शनात रिजनल हेड बाळकृष्ण कुलकर्णी यांनी म्हटले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालय आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक करारामुळे महाविद्यालयातील संशोधन आणि इनोव्हेशनला नवी दिशा मिळणार आहे. “सेंटर ऑफ एक्सीलन्स”च्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना रिसर्च, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि इंडस्ट्री मेंटरशिपशी थेट जोडत. बहुविषयक प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळेल. यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल आणि ते बांधकाम क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील. हा उपक्रम महाविद्यालयाच्या उद्दिष्टांना बळकट करत विद्यार्थ्यांना अकॅडमिकदृष्ट्या सक्षम आणि उद्योगासाठी तयार नेतृत्वकर्ते म्हणून घडविण्यासाठी एक मोठे पाऊल ठरेल असे त्यांनी म्हटले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तर, सेंटर ऑफ एक्सीलन्सच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, गुणवंत पदवीधर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंटर ऑफ एक्सीलन्सचे प्रमुख उद्दिष्टे

या सेंटरमध्ये खालील महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम होणार आहे –

*सिमेंट व कॉक्रीट तंत्रज्ञानातील प्रगत संशोधन.

*टिकाऊ व पर्यावरणपूरक शाश्वत बांधकाम तंत्रज्ञानावर केंद्रित प्रकल्प.

*विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा व प्रमाणन (Certification)

*संस्था व अल्ट्राटेक तज्ञांमधील संयुक्त संशोधन प्रकल्प.

*भविष्यातील स्मार्ट बिल्डिंग आणि पर्यावरण पूरक बांधकाम तंत्रज्ञानावर सखोल अभ्यास.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश