जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी”वर राष्ट्रीय परिषद संपन्न
भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत २९८ पेपर सादर ; तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल : मार्गदर्शकांचा सूर जळगाव , ता.३० : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. ३० रोजी “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी” या विषयावर दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत श्री. स्वामीनारायण मंदिर जळगावचे स्वामी नयन शास्त्री व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिपचे ट्रेनर तसेच सर्टिफाइड अॅडाइजेस असोसिएट प्रा. श्रीधर थोडा हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. आजच्या या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता , सोशल मीडिया यामुळे माहितीचा महापूर लोकांपर्यंत पोहोचतो आहे. अशा वेगवान जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य , एकाग्रता व आत्मिक शांती टिकवण्यासाठी माइंडफुलनेस आणि अध्यात्माचे साधन अधिक आवश्...