जी. एच. रायसोनी महाविद्यालयात 'श्री गणेशाचे' जल्लोषात स्वागत
मिरवणूकीत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा जल्लोष ; पाच दिवसीय गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन
जळगाव,
ता. २८ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय तसेच
जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय हे वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याच उपक्रमांच्या परंपरेत दरवर्षीप्रमाणे
याही वर्षी महाविद्यालयात गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
महाविद्यालयाच्या
मुख्य सभागृहात संचालिका, अॅकॅडमिक डीन, प्राचार्या, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व
विद्यार्थी यांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पाचशेहून
अधिक विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा
मोरया”च्या जयघोषात मिरवणुकीत सहभागी झाले.
या
पाच दिवसीय गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात
येणार आहे. ढोलताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण
परिसर गणेशमय झाला.
यावेळी
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, कनिष्ठ
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक,
प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment