जी. एच. रायसोनी महाविध्यालयात १८ ते २३ दरम्यान “सायबर सिक्युरिटी व फॉरेन्सिक सायन्स"वर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

डेटा नेटवर्क संरक्षण, डिजिटल फॉरेन्सिक टूल्स, सायबर थ्रेट इंटेलिजन्स, डेटा रीकव्हरी ऑफ कस्टडी, डिजिटल फॉरेन्सिक्सवर सखोल सत्रे ; "आजच नोंदणी करा आणि नामांकित उद्योगतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून थेट शिकण्याची संधी मिळवा!"

जळगाव, ता. १४  : एआईसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग (अटल) सेल प्रायोजितऍप्लिकेशन्स ऑफ एडवांस कॉम्प्युटिंग इन सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक सायन्स" या विषयावर सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम  (एफडीपी) ता. १८ ते २३ ऑगस्ट या कालावधीत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

आजच्या डिजिटल युगात वाढत्या प्रमाणात सायबर क्राईमच्या घटना घडत असून त्याविषयी जनजागृती पूर्वतयारी करणे अत्यावश्यक झाले आहे. याच उद्देशाने महाविद्यालयात "सायबर सेक्युरिटी" या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमातून सहभागीना सायबर हल्ल्यांचे प्रकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर, सायबर धोके टाळण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात येईल तसेच उद्योग जगतातील बदल गरजा लक्षात घेऊन प्राध्यापकांचे ज्ञान अपडेट करणे गरजेचे असून याच बाबीचा मागोवा घेवून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे प्राध्यापकांना नवीन ट्रेंड्स, संकल्पना, संशोधन पद्धती याबद्दल माहिती मिळावी तसेच सॉफ्ट स्किल्स, संशोधन लेखन, इनोव्हेशन, स्टार्टअप, सायबर सिक्युरिटी, फॉरेन्सिक सायन्स अशा नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण प्राध्यापकांना मिळावे या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या उपक्रमाच्या प्रमुख संयोजीका जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. . एम. महाजन यांच्या हस्ते होईल. तर या सहा दिवसीय उपक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट फॉरेन्सिक सायन्स संस्थेचे डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख. डॉ. चरणसिंग एन. कायटे, सायबर फॉरेन्सिक्स विभागातील डॉ. शोभा बाविस्कर, फॉरेन्सिक कायदा विभागप्रमुख डॉ. राहुल भारती, नाशिक येथील सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट श्री. तन्मय एस दीक्षित, वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेतील प्राध्यापक डॉ. दीपक शर्मा, डेटा अॅनालिटिक्समधील वरिष्ठ तज्ञ एलटीआय माइंडट्रीचे श्री. शुभम काबरे, राम अँटीव्हायरस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. कल्याण दाणी, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील आयटी सर्व्हिसचे संचालक डॉ. नितीन पाटील, यूएसए येथील सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट पंकज लढे, तसेच आशुतोष म्हेसकर हे विविध तज्ञ सायबरसुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्सचा परिचय, केस स्टडी विश्लेषण - वास्तविक जगातील सायबर घटना, फॉरेन्सिक तपास, लाईव्ह डेमोस्ट्रेशन- सायबर सुरक्षेतील एआय, एमएल आणि ब्लॉकचेन, सायबरसुरक्षेमध्ये मशीन लर्निंग आणि एआय अॅप्लिकेशन्स, डिजिटल फॉरेन्सिक टूल्स, एथिकल हॅकिंग अँड पेनिट्रेशन टेस्टिंग, सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्सचे कायदेशीर आणि नैतिक पैलू, सायबरसुरक्षेतील संशोधन संधी आणि भविष्यातील ट्रेंड यावर सखोल मार्गदर्शन करत गट चर्चा, पॅनेल चर्चा, असाइनमेंट, परस्परसंवादी प्रश्नोत्तरे, अभिप्राय उदयोन्मुख ट्रेंड्स यावर विविध सत्रे राबविणार आहे. या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी डीन ॲकॅडेमिक डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.रुपाली ढाके, प्रा. करिष्मा चौधरी,  प्रा.मानसी तळेले, प्रा.प्रीतम पाटील, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. शुभम अडवाल, प्रा. राहुल कंदरकर हे सहकार्य करीत आहे.

 

नुकतेचइनोव्हेशन अँड "एंटरप्रेन्योरशिप"वर एफडीपीचे यशस्वीपणे आयोजन

ता. २१ ते २५ जुलै दरम्यान शिक्षण मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल एआयसीटीई प्रायोजितइनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपया विषयावर पाच दिवसीय ऑफलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी भारत सरकारकडून. लाखांचे अनुदान मिळाले.

या उपक्रमात स्टार्टअप, इनोव्हेशन, डिझाईन थिंकिंग, एआय, डेटा सायन्स, आयपीआर, फायनान्शियल प्लॅनिंग, बिझनेस मॉडेल, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजी अशा विविध विषयांवर देशभरातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्राध्यापक, विद्यार्थी, नवउद्योजक आणि संशोधकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश