जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन ; विद्यार्थी, पालक व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

जळगाव, ता. १६  : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परंपरेनुसार सुदर्शन जैन प्रेरणा नागोरी या महाविद्यालयात प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, हा दिवस केवळ आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव नसून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळे आपण आज मुक्त श्वास घेऊ शकता त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की फक्त शिक्षणच नव्हे तर नैतिकता, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारी याही गोष्टी अंगीकारा, तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. "आपण सर्वांनी मिळून आपल्या भारताला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर अग्रगण्य बनवायचे आहे. असा मौलिक संदेश प्रा. डॉ. अग्रवाल यांनी दिला.या कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृदुला देशपांडे यांनी केले तर यावेळी अकॅडमिक डीन प्रा.डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश