जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला कबचौ विद्यापीठाकडून "एम्पॉवर्ड ऑटोनॉमस" दर्जा !

विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार ; निरंतर उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची मिळाली पावती : सर्वस्तरातून महाविध्यालयाचे कौतुक जळगाव , ता. २ ८ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून , व्यवस्थापन परिषदेने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाला अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा (एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज) प्रदान केला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एम्पॉवर्ड ऑटोनॉमस स्वायत्त दर्जा मिळालेले रायसोनी महाविद्यालय , यापुढे विद्यापीठ आणि महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करु शकणार आहेत. शनिवार , २१ जून २०२५ रोजी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. दरम्यान , एम्पॉवर्ड ऑटोनॉमस महाविद्यालयाला नवीन प्रमाणपत्र , पदविका , पदवी , पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी स्तरावरचे अभ्यासक्रमसुध्दा सुरू करता येणार आहेत. अभ्यासक्रमाची शुल्करचना , अभ्यासक्रमाची पुनर्रचना , मूल्यांकनाची पद्धत , निकाल जाहीर करणे , गुणपत्रक प्रदान करणे याबाबत महाविद्यालयाला आता स्वातंत्र्य मिळण...