आपण पर्यावरणाची काळजी घेतल्यास, निसर्ग आपोआप आपली काळजी घेईल : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात वृक्षारोपणाने 'विश्व पर्यावरण दिन' साजरा प्राध्यापकांनी केला प्रत्येक वाढदिवशी वृक्षारोपणाचा संकल्प

जळगाव ता.६ : येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘विश्व पर्यावरण दिन’ उत्साहात पार पडला. या निमित्त नैसर्गिक वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापकांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत म्हटले कि, 'एक व्यक्ती एक झाडही संकल्पना राबवली पाहिजे. वृक्षारोपण करणे व त्याचे संगोपन करणे हि काळाची गरज आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय करू शकतोअसा प्रश्न अनेकांना असेल. तर झाडे लावणेप्लॅस्टिकचा वापर कमी करणेऊर्जेची बचत करणेपाण्याचा योग्य वापर करणेपर्यावरणपूरक सवय लावून घेणे व इतरांना पर्यावरणाबद्दल प्रोत्साहित करणेया काही छोट्या गोष्टी करून आपण यावर्षीचा पर्यावरण दिन साजरा करू शकतो. असे नमूद त्यांनी यावेळी नमूद केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावतमॅकेनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटीलसिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवारसंगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटीलइलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटीलडेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटीलएमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटीलएमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी प्राध्यापकांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व लक्षात घेता स्वताच्या प्रत्येक वाढदिवशी वृक्षारोपणाचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली. सदर उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश