जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “जनरेटिव्ह एआय” या विषयावर स्टूडेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम
फ्युचर जॉब अपॉर्चुनिटी अंतर्गत तीन दिवसीय उपक्रमात असंख्य विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ; “एआय” क्षेत्रातील नामवंत तज्ञाचे सखोल मार्गदर्शन
या तीनदिवसीय स्टूडेंट डेव्हलपमेंट
प्रोग्रामच्या आयोजनामागचा हेतू व उद्देश आपल्या अध्यक्षीय भाषणातून नमूद करतांना
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले
कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने जगभरातील उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणली आहे, नोकरीच्या बाजारपेठेत बदल घडवून आणला आहे
आणि असंख्य करिअर संधी निर्माण केल्या आहेत. मोठमोठ्या आणि जगभरातील दिग्गज
कंपन्यांमध्ये एआय चा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एआय मध्ये प्राविण्य
मिळवलेल्या उमेदवारांच्या शोधात सध्या कंपन्या आहेत. यात आरोग्यसेवा, वित्त, शिक्षण, मनोरंजन आणि बरेच काही क्षेत्र प्रभावित
होत आहेत. उत्पादकता आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी व्यवसायांमध्ये एआयचा अवलंब
केला जात आहे. एआय उद्योगाचा वाढता वेग पाहता उमेदवारांची कमतरता सुद्धा जाणवत
आहे. त्यामुळे तरुणांना या क्षेत्रामध्ये दर्जेदार पगाराची नोकरी मिळण्याची चांगली
संधी असून मशीन लर्निंग इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, एआय रिसर्च सायंटिस्ट, संगणक व्हिजन इंजिनिअर, AI नीतिशास्त्रज्ञ, रोबोटिक्स अभियंता असे विविध एआय उद्योग क्षेत्रात मनुष्यबळाची मोठी मागणी असून याच अनुषंगाने या तीनदिवसीय स्टूडेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून एआय कोच नकुल
देशमुख व सॉफ्टवेअर ट्रेनर तेजस कालमेघ यांचा अनेक वर्षातील अनुभव व अभ्यास
विध्यार्थी आत्मसात करणार असून हा प्रोग्राम तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी
टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणर क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श
व्यासपीठ ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर उपक्रमाचे प्रमुख वक्ते एआय कोच
नकुल देशमुख तसेच सॉफ्टवेअर ट्रेनर तेजस कालमेघ यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद
केले कि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा ट्रेंड गेल्या काही
वर्षांपासून सुरू आहे. या टेक्नॉलॉजीचा वापर आणि क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली
आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात एआय हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारं तंत्रज्ञान असू शकतं, याच कारणामुळे आजकाल
प्रत्येक क्षेत्रात एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि याची
मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील
चर्चासत्रात श्री. नकुल व श्री. कालमेघ यांनी व्यक्त केले. या तीनदिवसीय स्टूडेंट
डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या आयोजनाप्रसंगी संयोजन समितीचे सर्व सदस्य यांचे मोलाचे
सहकार्य लाभले. या प्रोग्रामचा लाभ विविध विभागातील प्राध्यापक व विध्यार्थ्यानी
घेतला तसेच या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करिष्मा चौधरी यांनी केले तर आभार
कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले व या उपक्रमाचे
यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री.
सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
.jpg)
Comments
Post a Comment