जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

पहिला दिवस ; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

जळगाव, ता. १६ : वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. विद्यार्थ्यांचे औंक्षण तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत असे वातावरण शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील चिमुकल्यांचा प्रवेशोत्सवावेळी पाहायला मिळाले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची टॉडलर टेल्स ही प्राथमिक प्ले ग्रुप ते माध्यमिक स्कूल सोमवार ता. १६ जूनपासून सुरू झाली. यावेळी नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण शिक्षकांकडून ढोल ताशांच्या गजरात झालेले अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले. स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी चिमुकल्यांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व चॉकलेट देत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक, स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते. 

दर्जेदार शिक्षण देणारे “जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यासाठी  अट्रॅक्टिव्ह स्मार्ट क्लासरूम, किड्स लायब्रेरी, आर्ट स्टुडीओ, पपेट थेटर, आउटडोअर प्ले एरिया, मॉन्टेसरी  टूल बेस्ड लर्निग, लाईफ स्कील अँड , कल्चरल ट्रेनिग, आर्ट इंटेग्रेटेड लर्निग, स्पोर्ट  अँड फिटनेस ट्रेनिंग तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, योग्य अभ्यासक्रम, गुणवत्ता असलेले निष्ठावंत शिक्षक, आदर्श  पायाभूत सुविधा इत्यादी सर्व सुविधा रायसोनी  इन्स्टिट्यूटने शहरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या प्ले ग्रुप ते इयत्ता दहावी वर्गासाठी निर्माण करुन दिल्या आहेत. या स्कूलमध्ये शिक्षकांना ट्रेनिंग प्रोग्राम स्वतंत्र दिले आहेत तसेच  प्रत्येक वर्गाचे  सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यात आणि देशात रायसोनी इन्स्टिट्यूटला सर्वोत्तम मानले जाते. तो दर्जा “जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये देखील कायम ठेवला जाईल, असे मत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी स्कूलच्या पहिल्या दिवशी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश