जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला कबचौ विद्यापीठाकडून "एम्पॉवर्ड ऑटोनॉमस" दर्जा !
विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार ; निरंतर उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची मिळाली पावती : सर्वस्तरातून महाविध्यालयाचे कौतुक
दरम्यान, एम्पॉवर्ड ऑटोनॉमस महाविद्यालयाला नवीन
प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी स्तरावरचे
अभ्यासक्रमसुध्दा सुरू करता येणार आहेत. अभ्यासक्रमाची शुल्करचना, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, मूल्यांकनाची पद्धत, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक प्रदान करणे याबाबत
महाविद्यालयाला आता स्वातंत्र्य मिळणार असल्याचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले. एम्पॉवर्ड ऑटोनॉमस दर्जा
प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. महाविद्यालयाला
२०१९ मध्ये नॅक “ए” ग्रेड सोबतच युजीसीकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त
झाला होता तसेच गेल्या चार
वर्षापासून सतत केंद्रीय शिक्षण
मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात
आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून भारत सरकारचे '३.५' स्टार रेटिंग महाविद्यालयाला मिळत आहे व नुकतेच बहिणाबाई विध्यापिठातर्फे "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार व आता
"एम्पॉवर्ड ऑटोनॉमस" दर्जा प्रदान करण्यात आल्याने जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या दिशादर्शक मार्गदर्शन व
नेतृत्वाखाली गेल्या अठरा वर्षातील महाविद्यालयाची प्रगती "एम्पॉवर्ड
ऑटोनॉमस" दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्वाचे ठरली.
स्वायत्तता मिळाल्यापासून महाविद्यालयाने
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना रोजगारायोग्य बनवण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, नवनवीन अभ्यासक्रम सुरु करणे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठी
खास उपक्रम चालू करणे अशा अनेक पातळीवर महाविद्यालयात काम सुरु आहे. गेल्या अठरा
वर्षात सुरु केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये बीबीए, एमबीए, बीसीए, एमसीए, तसेच अभियांत्रिकीचे कॉम्प्यूटर सायन्स
अॅन्ड इंजिनीयरिंग, इन्फोर्मेशन
टेक्नोलॉजी, सिव्हील
इंजिनियरिंग, मॅकनिकल
इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल
इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल टेली
कम्युनिकेशन इंजिनियरिंग या नियमित कोर्सेस सोबतच ज्या विषयामध्ये सर्वात जास्त
संधी आहे अश्या आर्टिफिशयल इंटेलीजन्स, मशीन
लर्निग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमाचा देखील इमर्जिंग कोर्सेस मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट
विभागाने रायसोनीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यात
इंडस्ट्री ५.०, स्टार्ट-अप, इटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट, डिझाईन थिंकिंग, क्रिटीकल थिंकिंग, इनोव्हेशन, पेटेंट फायलिंग यासारख्या आधुनिक
विषयांची चर्चासत्रे व कार्यशाळा भरविण्यात येतात. नुकतीच विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा उत्तर
महाराष्ट्रात प्रथमच रायसोनी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ८
राज्यातून ६० संघ सहभागी होऊन सलग २८ तास हि स्पर्धा
कार्यरत राहिली. तसेच यावर्षी एनपीटीईएल स्वयम हा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १२०० विध्यार्थी व
२०० प्राध्यापकानी पूर्ण केला या ऑनलाईन कोर्समध्ये काही राष्ट्रीय स्तरावर टोपर्स देखील आहेत. रायसोनी महाविद्यालयातील अनेक
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य मानांकन पटकविले असून महाविद्यालयाच्या विध्यार्थी व
प्राध्यापकांनी एकूण २५१ कॉपीराईट दाखल करत नवीन विक्रम नोंदविला आहे.
जी. एच. रायसोनी महाविद्यालय अत्यंत
प्रभावीरित्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवीत असून यात मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट, युनिवर्सल ह्युमन व्हेल्यू व ‘इंडियन
नॉलेज सिस्टीम’ चे अद्यावत सेंटर व विविध कोर्सेसचे देखील एनइपीनुसार
विध्यार्थ्यांचे अध्ययन येथे सुरु आहे
चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाला १८
वर्ष पूर्ण होत आहेत. शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणि काळानुसार झालेले बदल
स्विकारून विद्यार्थ्यांचे हित जोपासत संस्थेची वाटचाल सुरु असून रायसोनी इन्स्टिट्यूटने शिक्षण क्षेत्रात अतिशय मोठ्या
प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात आगेकूच करून संस्थेचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले
आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नेहमी सक्रियतेने सकारात्मक निर्णय
घेतले जातात. वेळोवेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनीलजी रायसोनी यांचे मार्गदर्शन
मिळाल्याने हे यश अधोरेखित झाले आहे.
प्रतिक्रिया
भविष्यातील दर्जात्मक शिक्षणासाठी
विद्यापीठाचा मोठा विश्वास
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, संचालिका : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट
जळगाव
महाविद्यालयाने घेतलेल्या अथक परिश्रमाची
फलश्रुती व भविष्यातील दर्जात्मक शिक्षणासाठी विद्यापीठाने व्यक्त केलेला मोठा
विश्वास म्हणजेच "एम्पॉवर्ड ऑटोनॉमस" दर्जा ! आहे. संस्थेचे अध्यक्ष
श्री. सुनीलजी रायसोनी यांचे बियॉड व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर
सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी महाविध्यालय विद्यापीठाच्या या एक्सलन्स पातळीला
गाठू शकले. रायसोनी इस्टीट्यूटच्या जळगाव शाखेची मी संस्थापक सदस्य या नात्याने
२००७ ला २०० ते आज असलेल्या ४५०० विध्यार्थ्यांचा वाढीव आलेखची मी स्वतः साक्षीदार
असून निरंतर उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळेच हे शक्य झाले याचा मला आनंद वाटतो.
तसेच येत्या काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या इस्टीट्यूट कडून अपेक्षा आहेत
त्यानिश्चितच आम्ही पूर्ण करू तसेच दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडणार
नाही. नवनवीनउद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील आहोत,
ज्यामुळे आपल्या
भागातील विध्यार्थ्यांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. स्वायत्त रायसोनी
महाविद्यालय हे इनोव्हेशनच्या बाबतीत सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. इनोव्हेशन
कौन्सिलअंतर्गत गेल्या चार वर्षात जवळपास १५० ऑनलाईन सत्रांचे आयोजन केले आहे.
‘आयपीआर’अंतर्गत महाविद्यालयाने ३५० कॉपीराईट, २४ पेटंट नोंद केले आहेत. बौद्धिक
मालमत्ता अधिकार, इनोव्हेशन,
स्टार्टअप,
उद्योजकता यावर
महाविद्यालयात सातत्याने जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध
क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मेजर-
मायनर हि सिस्टीम राबवत दोन डोमेनमध्ये यशस्वी करिअरसाठी विद्यार्थ्यांना
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय पद्धतींत शिक्षित करीत आहोत तसेच
प्रॅक्टिकल स्किल बेस्ड ट्रेनिंग वर भर, बदलत्या गरजा लक्षात घेवून अभ्यासक्रमात बदल, एक पूर्ण सेमिस्टर नामांकित संस्थेमध्ये
करण्याचे ऑप्शन विध्यार्थ्यांना उपलब्ध आहे तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालय १००
टक्क्यापैकी ४० टक्के अभ्यासक्रम हा विध्यार्थ्यांना त्याच्या पसंतीचे कोर्सेस
घेवून ऑनलाईन मोडमध्ये पूर्ण करण्याची संधी देत असून स्कीलबेस शिक्षणावर अधिक भर
यात देण्यात येत आहे. दरवर्षी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागातून असंख्य
विद्यार्थी विविध कंपनीत निवडले जात आहे. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, आयबीएम नॅसकॉम हॅकेथॉन, मंथन हॅकेथॉन आदी स्पर्धांमध्ये
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश
मिळवले आहे. स्वयम एनपीटीईएल, एनआयटीटीटी ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचे सक्रिय सभासद
असलेल्या रायसोनी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण,
रौप्य मानांकन
पटकविले असून त्याचीच फलश्रुती हा विध्यापिठाचा "एम्पॉवर्ड ऑटोनॉमस"
दर्जा ! आहे.
Comments
Post a Comment