स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विविध विभागातील “टॉपर्स, पीअर टीचर व सर्वोत्कुष्ट संशोधक" सन्मानित
३४ गोल्ड तर ३५ सिल्वर मेडल देत विध्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर यांची प्रमुख उपस्थिती जळगाव , ता. २६ : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात ता. २६ शनीवार रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच “ पीअर टीचर ” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर हे अध्यक्षस्थानी होते. तर विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती व श्रद्धा मैट्सचे सीएमडी महेंद्र रायसोनी ...