स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विविध विभागातील “टॉपर्स, पीअर टीचर व सर्वोत्कुष्ट संशोधक" सन्मानित
३४ गोल्ड तर ३५ सिल्वर मेडल देत विध्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव, ता. २६ : स्वायत्त जी. एच. रायसोनी
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात
ता. २६ शनीवार
रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय
आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच “पीअर टीचर” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि
शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत
असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून
भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा
विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला कबचौ उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर
हे
अध्यक्षस्थानी होते. तर विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती व श्रद्धा
मैट्सचे सीएमडी महेंद्र रायसोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच जी.
एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले.
या समारंभाच्या प्रास्ताविकेत रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष
श्री. सुनीलजी रायसोनी यांचे बियोंड व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर
सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट
महाविध्यालय संपूर्ण रिजनमध्ये “सर्वोकृष्ट” या एक्सलन्स पातळीला गाठू शकले.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडली नाही
तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील
असल्याने आपल्या भागातील विध्यार्थ्यांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासत नाहीए तसेच
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून
थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती
पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार आहे व येत्या
काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या आमच्या रायसोनी इस्टीट्यूटकडून अपेक्षा
आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर प्रा.डॉ.पी.पी.
माहुलीकर यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला
नुकताच कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविध्यालय” हा पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेच्या
शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०
च्या दिशेने शिक्षण क्षेत्राचे मार्गक्रमण सुरु असून या तंत्रज्ञानाच्या काळात नव्या
पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक
आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे
अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी पुढील
आयुष्यात करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी
आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते असे त्यांनी मार्गदर्शनात
नमूद केले. यानंतर श्री. प्रमोद संचेती
यांनी नमूद केले कि, आजचे शिक्षण आणि उद्योगांना लागणारी कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे.
यामुळे रोजगार उपलब्ध असतांनाही प्रत्यक्षात मिळत नाही आणि शिक्षण असूनही उमेदवार
बेरोजगार राहतात. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे
तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच तंत्रज्ञानामुळे उद्योगात
बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या
यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे
सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या
प्रवाहासोबत जुडवून घ्यावे तसेच उद्योजकानी चांगल्या वेळेची वाट पाहत न बसता
त्याच्यासाठी प्रत्येक वेळ ही काही सकारात्मकतेच्या सुरुवातीसाठी चांगली असते असे
मत व्यक्त करत त्यांनी महाविद्यालयातील “रायसोनी मंडी” या उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमातून
विध्यार्थी “लर्निग
बाय सेलिंग” शिकतात
आणि त्यांचा त्यांनी निश्चितच भविष्यात फायदा होतो असे सांगितले. यानंतर श्री. महेंद्र
रायसोनी यांनी नमूद केले कि, रायसोनी महाविद्यालयाचा विकास हा जलद गतीने व
सातत्याने चालू असून महाविद्यालयातील प्राध्यापकाची दृष्टी आणि ध्येय कायम आहेत
आणि ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत असून आजच्या
कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विभागातील “टॉपर्स व पीअर टीचर यांना पालकांसोबत
सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढील शैक्षणिक
कामगिरीसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारे ठरेल असे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात
नमूद केले. यावेळी यावर्षीचा “सर्वोत्कुष्ट संशोधक पुरस्कार” जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. डॉ.
मुकुंद पाटील यांना तर २०२४-२५ मध्ये पीएचडी प्राप्त केल्याने कॉम्प्युटर सायन्स
अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. डॉ. स्वाती पाटील याचा सत्कार करण्यात आला. यासोबतच राष्ट्रीय क्रिक्रेट संघात निवड झालेल्या
महाविद्यालयातील नचिकेत ठाकूर या विध्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार देखील यावेळी
करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून मागील वर्षी
प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित
करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तर
पुरस्कृत विध्यार्थी व पिअर टीचर्स यांना पालकांसोबत व्यासपीठावर बोलावण्याची
जबाबदारी एमबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील यांनी पार पाडली तसेच
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा प्राध्यापकेतर
कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सन्मानित गुणवंत पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
३४ विद्यार्थ्यांनी केली सुवर्ण
पदकांची कमाई
सूर्यवंशी भूमिका मनोज (बी.टेक), पाटील
धनश्री संदिपकुमार (बी.टेक), सोमवंशी सिद्धी शामचंद्र (बी.टेक, पुरोहित समिक्षा
अनिल (बी.टेक), जाधवांनी भूमिका अनिलकुमार (बी.टेक), पाटील परेश ईश्वर (बी.टेक), देशमुख विवेक प्रदिप (बी.टेक), सहाणे विशाल
मनोहर (बी.टेक), बारी देवीदास सुनील (बी.टेक), तलरेजा लोकेश सुभाष (बीसीए),
छज्जर दिव्या सुरेंद्र
(बीबीए), वैष्णवी बसवेश्वर घोडेश्वर (बीबीए),
महाजन दिपिका कैलास (एमसीए), नागोरी प्रेरणा
कल्पेश (एमबीए), पाटील देवेंद्र शिवकुमार बॅचलर (बी.टेक),
झांबरे निरज नवल (बी.टेक), सोनार चैताली विजय (बी.टेक), पाटील श्रुतिका विजय (बी.टेक),
तेली पियुष विष्णू (बी.टेक), फुसे राहुल किशोर (बी.टेक), पाटील कामिनी मुकेश (बी.टेक),
बारी चेतन विश्राम (बी.टेक), पाटील प्रतीक्षा प्रमोद (बी.टेक), अल्फेज फय्याज
देशमुख (बी.टेक), पाटील अंशिका महेंद्र (बीसीए), जैन
सुदर्शन दिनेश (बीबीए),
साळुंके मोहित किशोर (बी.टेक), लांबोले पूनम संभाजी (बी.टेक), देशमुख शेवंता
राजेंद्र (बी.टेक), पवार प्रियांका रवींद्र (बी.टेक), पाटील धनश्री पंडित (बी.टेक),
खैरनार दिनेश किशोर (बी.टेक), रुंगठा विशाल भारत (बी.टेक), सोनावणे मोहित
चंद्रशेखर (बी.टेक)
३५ विद्यार्थ्यांना “सिल्वर पदक”
नेरकर खुशवंत भूपेंद्र (बी.टेक), धुमाले आरती पुरुषोत्तम (बी.टेक), कोळी भाग्यश्री दिगंबर (बी.टेक), शिंदे जयदीप निवृत्ती (बी.टेक), सोनवणे प्रियल विनोद (बी.टेक), महाजन सुमित नाना (बी.टेक), कोळी शुभांगी गणेश (बी.टेक), मोहम्मद सुफियान गफ्फर शेख (बी.टेक), शाही ओमराज राजकुमार (बी.टेक), सोनिया दर्शन नाथानी (बीसीए), आहुजा सानिया प्रेमकुमार (बीसीए), प्रियांका
सुरेंद्र शर्मा (बीबीए), राजेश्वरी
देविदास पवार (बीबीए),
(एमसीए) जोशी नुपूर चंद्रकांत, आहुजा नॅन्सी
नारायण (एमबीए), भोई योगेश
सोमा (बी.टेक), काटे हृषिकेश गजानन (बी.टेक), शिंदे दिव्या पांडुरंग (बी.टेक), फुसे
अनुराधा अरविंद (बी.टेक), गायकवाड अजय भगवान (बी.टेक), साळुंखे पुष्पराज रामकृष्ण (बी.टेक),
ताडे स्नेहल (बी.टेक), चोपडे संकेत पुरुषोत्तम (बी.टेक), बारी प्रदिप वसंत (बी.टेक),
सपकाळे राजनंदिनी घनश्याम (बी.टेक), मिस्तारी निखिल गोविंद (बीसीए), जयसिंघानी
मेहक सुनील (बीबीए),
साळुंखे नेहा राजेंद्र (बी.टेक), राणे सानिका संदिप (बी.टेक), साहा प्रिती गौरांगा
(बी.टेक), कुलकर्णी प्रतिक्ष दिवाकर (बी.टेक), म्हस्के आदेश सुधाकर (बी.टेक), शिंदे
प्रथमेश संभाजी (बी.टेक), सुतार प्रथमेश संतोष (बी.टेक), पाटील मयूर सुनील (बी.टेक),
या पिअर टीचर्सचा गौरव
नुपूर जोशी (एमसीए), अक्षय पालवे(एमसीए),
रोनित बाविस्कर (एमबीए), कुशल अग्रवाल (बीबीए), आदित्य देविदास
निकम (बी.टेक), चेतन विश्राम बारी (बी.टेक), धनश्री पंडित पाटील (बी.टेक), श्रुती
विजय वानखेडे (बी.टेक), निधी बाजपेयी (बी.टेक), श्रुती विजय वानखेडे (बी.टेक), निधी
बाजपेयी (बी.टेक), सिद्धी चौधरी (बी.टेक), प्रणव पाटील (बी.टेक), मुकेश पाटील (बी.टेक),
भाग्येश चौधरी (बी.टेक), यशराज पाटील (बी.टेक), रुषिकेश साळुंखे (बी.टेक), निखिल कुमार सिंग (बी.टेक), जयेश पाटील (बी.टेक), हर्षल चौधरी (बी.टेक), स्वप्नील
श्रावणे (बी.टेक), ईशा कोल्हे (बी.टेक), ध्रुव लोटवाला (बी.टेक), हर्षल मोतीराया (बी.टेक),
दर्शन हिरे (बी.टेक)
Comments
Post a Comment