शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश म्हणजे विकसित देशाच्या दिशेने वाटचाल : प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा ; एनईपी, भारतीय ज्ञान प्रणाली, कौशल्य विकासासाठी इंटर्नशिप-अॅप्रेंटिसशिप अशा विविध विषयांवर तज्ञांचे सखोल मार्गदर्शन
जळगाव, ता. २१ : प्राचीन भारतीय ऋषींनी आणि विद्वानांनी कित्येक शतकांपूर्वी प्रचंड प्रमाणात ज्ञाननिर्मिती करून ठेवली आहे. मौखिक परंपरा, हस्तलिखिते, पारंपरिक पद्धती, शिलालेख अशा विविध माध्यमांमध्ये ही निर्मिती करण्यात आली आहे. स्थापत्यशास्त्र, गणित, कृषी, पर्यावरण, खगोलशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये हे ज्ञान उपलब्ध आहे. शालेय धड्यांपासून ते उच्चशिक्षणापर्यंत विविध पातळ्यांवर आता हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार असल्याने शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश म्हणजे विकसित देशाच्या दिशेने वाटचाल असे गौरवोद्गार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी काढले.
पीएम-उषा योजनेंतर्गत जी. एच. रायसोनी
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय येथे एनईपी, भारतीय ज्ञान
प्रणाली, कौशल्य विकासासाठी इंटर्नशिप-अॅप्रेंटिसशिप अशा
विविध विषयांवर एकदिवसीय
कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्चचे प्रा. राजेश खंबायत, कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेटचे
अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. डॉ. दिनेश एस. दलाल तसेच मुजे महाविद्यालयातील
प्रा. केतन नारखेडे हे प्रमुख वक्ते तर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे व्यासपीठावर उपस्थित
होते.
कार्यशाळेचे
प्रास्ताविक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, गुणवत्ता व कौशल्यधारित योग्य
शिक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून शैक्षणिक संस्थांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ
नये या उद्देशाने भारत सरकाच्या शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणाला बळकटी
देण्यासाठी देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा
अभियान राबविण्याचे सूचित केल्यानुसार उत्तर महाराष्ट्र भागातील विध्यार्थी व शिक्षकांना
वृद्धिगंत करण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून
उपस्थित तज्ञाचे सखोल मार्गदर्शन विध्यार्थी व प्राध्यापकांना नक्कीच उपयोगी पडणार
आहे. तसेच जागतिक स्तरावरील समस्या सोडवायच्या असतील तर आपण कात टाकली पाहिजे.
त्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या विविध योजनासहित नवे शैक्षणिक धोरण मदत करेल.
यावेळी या धोरणाला अनुसरून त्यांनी सांगितले कि इंजीनियरिंग व बिझनेस मॅनेजमेंट या
शाखांमध्ये “मेजर आणि मायनर” या नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबीचा समावेश रायसोनी
महाविद्यालयाने केले असून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे यात शिकता येणार
आहेत तसेच ओपन इलेक्टिव सब्जेक्ट, ऑन द जॉब ट्रेनीग, फिल्ड प्रोजेक्ट, समाजाभिमुख विविध कार्यक्रम, इंडियन नॉलेज
सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या संस्कृती व ज्ञान या विविध वैशिष्टपूर्ण विषयांचा
अभ्यासक्रमात समावेश करत रायसोनी महाविध्यालय विध्यार्थ्यांना दोन क्रेडीट देणार
असल्याचे नियोजन आहे. यासोबतच इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये विध्यार्थ्यांना
महाराष्ट्रातील किल्ले, भारतातील मुख्य नद्या, अजिंठा, एलोरा यासारख्या विविध लेण्याच्या अभ्यासासाठी २ क्रेडीट दिले
जाणार असल्याचे म्हणत त्यांनी विध्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” हे ब्लु प्रिंट असल्याचे नमूद केले.
यानंतर
कार्यक्रमातील पहिल्या सत्रात प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी “भारतीय ज्ञान प्रणालीतील शाश्वत विकासाचा दृष्टीकोन” या विषयावर भाष्य करत नमूद केले कि, शाश्वत विकासाच्या दिशेने
विचार करण्यास आणि कार्यक्रम राबविण्यास सगळ्या जगाने गेल्या काही वर्षांपासून
सुरुवात केली. मुळात आपल्याकडे विकासासाठी पुरेशी संसाधने नसल्याने भारत गरीब झाला
असे अनेकांना वाटते. त्यांना वाटते की, आपल्याकडे विज्ञानाचा अभाव होता. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा
विकास होण्यास बराच कालावधी लागतो आणि त्यात आपल्या देशाचे मोठे योगदान आहे. आमचे
ज्ञान दडपले गेले म्हणून आम्ही गरीब झालो. आपण इतिहासापासून धडे घेतले पाहिजे.
एखाद्या देशाची स्मरणशक्ती कमी झाली तर त्या देशात राहणाऱ्या लोकांची शक्तीही
समाप्त होते. त्यामुळे इतिहास ज्ञात असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला भूतकाळाचे
आकलन नसेल, तर तुम्हाला समजणार नाही की. आपण कुठे उभे आहोत. आपण कुठून आलो
आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे? आपल्या देशात असे अनेक लोक आहेत. ज्यांच्या मनात कुठे जायचे आहे.
का जायचे आहे आणि कसे जायचे आहे याबाबत संभ्रम आहे. याचप्रमाणे कधी कधी देश
म्हणूनही पेच निर्माण होतो. म्हणून आपण काय आहोत, आपले ज्ञान काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. आज या सदर्भात आपली
हरवलेली स्मरणशक्ती परत आणण्याची गरज आहे. नालंदा विद्यापीठात केवळ वेद, शास्त्र आणि रामायण इत्यादी विषय शिकवले जात नव्हते, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम तेथे तयार
केलेले होते. याशिवाय इतर किती अभ्यासक्रम आणि विषय होते याची मोजदादच नाही. असे
मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर दुसऱ्या सत्रात प्रा. राजेश खंबायत यांनी “एनईपी २०२० : व्यावसायिक शिक्षेचा पुनर्विचार” या विषयावर नमूद केले कि, नव्या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांच्या
व्यवसायिक कौशल्याचा विकास होऊन तो नोकरी मागणारा नाही, तर इतरांना नोकरी देणारा होईल व भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या
दृष्टीचा विकास होईल. भारत जगाचा नेता व्हावा असा धोरण ठरविण्यामागे दृष्टिकोन
आहे. हा शिक्षणातील क्रांतीचा आराखडा आहे. याची अंमलबजावणी जर ठरल्याप्रमाणे झाली
तर आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू तसेच कौशल्य व ज्ञान ही आर्थिक वृध्दीची आणि
सामाजिक विकासाची प्रेरकशक्ती आहेत. उच्चस्तरावरील व उत्तम दर्जाची कौशल्ये असलेले
प्रदेश हे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय रोजगार बाजारातील आव्हानांशी व संधीशी अधिक
परिणामकारकपणे जुळवून घेतात. वेग, दर्जा, गुणवत्ता व शाश्वतता या प्रमाणात कौशल्यविषयक आव्हाने पूर्ण करणे
हे प्राथमिक ध्येय्य आहे. त्याअनुषंगाने या दशकात राज्यातील सर्व प्रशालांमध्ये व
उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण टप्याटप्याने समाविष्ट करावयाचे
लक्ष्य असून ही समिती त्याअनुषंगाने व्यापक अभ्यास करत मार्गक्रमण करत असल्याचे
त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर तीसऱ्या सत्रात प्रा. केतन नारखेडे यांनी “करिअरचे नवीन मार्ग : इंटर्नशिप, अॅप्रेंटिसशिप आणि ओ.जे.टी.” यावर भाष्य करत सांगितले कि, आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जॉब
मार्केटमध्ये, प्रभावी कौशल्य विकासासाठी इंटर्नशिप्स आणि अप्रेंटिसशिप्स अधिक
महत्त्वाच्या बनल्या आहेत. कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी थिअरीबरोबरच
व्यावहारिक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कौशल्यावर
आधारित शिक्षणाला खूप महत्त्व दिले जात आहे. वास्तविक, आजकाल कौशल्यावर आधारित नोकऱ्यांचा ट्रेंड भारतात खूप वाढला आहे. याद्वारे
नोकरी मिळवणे आणि स्वतःसाठी जागा बनवणे सोपे होते. म्हणूनच अनेक स्किल्ड आणि अन्स्कील्ड उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी
आणि इंटर्नशिप, ओ.जे.टी. आणि अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या असल्याचे
त्यांनी सांगितले यानंतर चौथ्या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र
विध्यापिठातील प्रा. डॉ. दिनेश एस. दलाल यांनी “होलिस्टिक एंड मल्टीडीसिल्पणरी एज्युकेशन इन एनईपी-२०२०” या विषयावर मार्गदर्शन करत नमूद केले कि, नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून
यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत
काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाव्दारे आत्मनिर्भर करण्यात येणार
आहे. यात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून विविध शाखेतील विषय
निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
या कार्यशाळेच्या
आभार प्रदर्शन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ.
संजय शेखावत यांनी नमूद केले कि, विद्यार्थ्यांचे एनईपी, भारतीय ज्ञान प्रणाली, कौशल्य
विकासासाठी इंटर्नशिप-अॅप्रेंटिसशिप अश्या विविध विषयातील ज्ञान व ते वापरण्याचे कौशल्य विकसित
करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे खात्रीने एक सकारात्मक बदल झालेला
दिसून येईल, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यावेळी उपस्थित
वक्ते व सहभागी विध्यार्थी तसेच प्राध्यापकांचे श्री. शेखावत यांनी आभार मानले. सदर
कार्यशाळेचे समन्वय प्रा. सोनल पाटील, प्रा. अमोल जोशी, प्रा. स्वाती पाटील यांनी साधले
तसेच कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष
श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment