जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “गुड टच, बॅड टच” या विषयावर कार्यशाळा
प्रसिद्ध कॉस्मेटिक व स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिप्ती पायघन यांचे सखोल मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
जळगाव, ता. २३ शालेय जीवनात विद्यार्थ्यांना "गुड टच आणि बैड टच' बद्दल जागरुकता असायला हवी आणि अनावश्यक घटना थांबवण्यासाठी सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी, कसा ओळखावा चांगला आणि वाईट स्पर्श या विषयावर नुकतेच मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या संकल्पनेतून 'गुड टच, बैड टच या समुपदेशन आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ८ ते १५ वर्षे वयोगटातील ९० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
याप्रसंगी प्रमुख
मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कॉस्मेटिक स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिप्ती पायघन या उपस्थित
होत्या त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतांना नमूद केले कि, लहान मुलांना एखाद्याचा
स्पर्श चांगला आहे की वाईट हेतूने आहे, हे समजणे फार गरजेचे आहे. वाईट स्पर्श करणाऱ्यांपासून सावध राहणे
गरजेचे आहे, इतके भान शालेय विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यकच आहे. 'काही मुलांना, विशेषतः मुलींना
स्वतःहून विचारले, तरी शाळेत किंवा घराबाहेर काय घडले, हे सांगण्याचा
स्वभाव नसतो. अशावेळी त्यांना विश्वासात घेऊन काय घडले हे त्यांच्याकडून जाणून
घेण्याची जबाबदारी पालकांवरच आहे. छेडछाड, टोमणे यांची माहिती लगेचच पालकांना देणे गरजेचे असते, ही भावना या
कार्यशाळेच्या माध्यमातून मुलींमध्ये वाढविण्याचा डॉ. दिप्ती पायघन यांनी प्रयत्न
करत अतिशय सुंदर उदाहरणे देऊन ही संकल्पना मुलांना समजावून सांगितली.
यानंतर कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगताना मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी नमूद केले कि, अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये जवळचे नातेवाईक, शेजारी-पाजारी, शाळेतील कर्मचारी यांचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. हे रोखण्यासाठी प्रशासन, पोलिस, शिक्षक, पालक अशा सर्वच स्तरातील लोकांनी जागरुकतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेत डॉ. दिप्ती पायघन यांनी समुपदेशन केल्याने त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्लीम रंगरेज यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी मानले. तर यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment