जी. एच. रायसोनी महाविध्यालयात नवनियुक्त “स्टुडंट कौन्सिल”चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
कौन्सिलची धुरा सांभाळण्यासाठी कार्यकारिणी समितीची नवनियुक्ती ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती
प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर स्टुडंट
कौन्सिल स्थापनेच्या समारंभात सर्व शाखातील कौन्सिलच्या विध्यार्थ्यांना त्यांच्या
पदानुसार सॅश, बॅनर, ध्वज, बॅज इत्यादी
सन्मानचिन्हे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी
प्रमुख प्रतिनिधी कुणाल शर्मा व प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी भाविका घाटे यांनी आगामी
काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपक्रमाचा आढावा
प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिला.
यानंतर
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, स्टुडंट कौन्सिल समारंभानंतर खऱ्या अर्थाने
तुमच्यावर आता नवीन जबाबदाऱ्या येतील व प्रत्येक जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पार
पाडायचे आहे तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विध्यार्थ्यांमधील वक्तृत्व व
नेतृत्व या गुणवाढीसाठी “स्टुडंट कौन्सिल” हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवीत
असल्याचा अभिमान असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी, सर्वांना उच्च गुणवत्तेचे स्कीलबेस शिक्षण
उपलब्ध करून देणे हा आहे अन त्याचाच आधार घेत आम्ही विध्यार्थ्यांच्या ३६० डिग्री
होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करीत आहे, थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध
अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी स्टुडंट
कौन्सिलच्या सर्व नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पुढे येणाऱ्या
सर्व उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून ते यशस्वी करण्याबद्दल आवाहन केले.
यानंतर
अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी नमूद केले की, विद्यार्थी दशेत असताना
आपण आपला सर्वांगीण विकास साध्य करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण एक उत्तम लीडर होऊ
शकतो. त्यांनी या गोष्टीशी निगडीत असलेले अनेक उदाहरणांसाहित विद्यार्थ्यांना हे
पटवून दिले. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाते
ही खूप महत्त्वाची बाब असल्याचे म्हटले तसेच आधीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे
प्लॅटफॉर्म नव्हते. पण आज या माध्यमातून वर्किंग टुगेदर आणि पियर लर्निंग गरजेचे
आहे. बऱ्याच वेळेस पालकांची आर्थिक स्थिती, कम्युनिकेशन स्किल, धाडस, या
गोष्टींच्या न्यूनगंडांमुळे विद्यार्थी मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांना या
प्रकारचा प्लॅटफॉर्म नक्कीच फायद्याचा ठरेल असे त्यांनी म्हटले. सदर स्थापना
समारंभाचे आभार प्रदर्शन स्टुडंट कौन्सिल मेंटर प्रा. वसिम पटेल यांनी केले तर देवेश्री
भक्कड या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. महाविध्यालयात स्टुडंट कौन्सिल ची पुनस्थापना झाल्याने जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्री.श्रेयसजी रायसोनी यांनी सर्व
प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त कार्यकारिणी समिती
जी.
एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल ह्यांच्या
पुढाकाराने स्थापन झालेल्या या स्टुडंट कौन्सिलची धुरा सांभाळण्यासाठी
कार्यकारिणी समिती नेमण्यात आली आहे. वर्ष २०२४-२०२५ मधील कार्यकारणीत कुणाल शर्मा (अध्यक्ष), भाविका घाटे (उपाध्यक्ष), स्वप्नील श्रावणे (विद्यापीठ प्रतिनिधी), रिया तळेले (विद्यापीठ प्रतिनिधी), कन्हैया चौधरी (सचिव), तुषार पाटील (खजिनदार), उमेश झुरके (कोषाध्यक्ष), आदित्य ताडे (शैक्षणिक प्रतिनिधी), यशराज पाटील (तांत्रिक प्रमुख), रिहाल कर्माकर (जनसंपर्क प्रमुख), मणियार शेख इम्रान शेख इरफान (सांस्कृतिक प्रमुख), पंकज पाटील (क्रीडा प्रमुख), धनश्री पाटील,
रुतुजा पाटील, राज सोनवणे (क्रीडा प्रतिनिधी), श्रीकेश पाटील (शिस्त प्रमुख) तसेच अक्षया
दाणी, रोहित मराठे, अभय नारखेडे, प्राची नायसे, करण जाधवनी, रोहिता चौधरी, भाग्येश
चौधरी, श्रेयश शेजवळ, खुशी सुर्यवंशी, नकुल महाजन, निनाद गव्हाळे, हृषीकांत चोपडे,
निधी बाजपेयी, प्रतीक्षा चव्हाण हे सांस्कृतिक प्रतिनिधी तर जयेश पाटील, पियुष
साळुंखे, रिचर्ड पिंडू, ज्ञानेश्वर पाटील, साहिल सुरवाडे, हर्षल पाटील, मानसीज झा,
गौरव महाजन हे डिसिप्लीन टीम तसेच मंजिरी भोळे, रिया भंगाळे, रुचिता बारी, पूनम
बाविस्कर हे महिला प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे.
Comments
Post a Comment