जी. एच. रायसोनी महाविध्यालयात "जलदुर्गांची साखळी, कौशल्याची मांदियाळी" या पुस्तकाचे प्रकाशन

जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते प्रकाशन ; "स्वराज्य आरमार दिनाचेऔचित्य साधून प्रकाशन सोहळा संपन्न !

जळगाव, ता. २५ : हिंदवी स्वराज्य आरमार दिनाचे औचित्य साधून देवदत्त व रश्मी गोखले लिखित "जलदुर्गांची साखळी, कौशल्याची मांदियाळी" या पुस्तकाचे प्रकाशन जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, बी.बी.ए. विभागप्रमुख डॉ. विशाल राणा हे उपस्थित होते. प्रास्ताविकात लेखक लेखिका देवदत्त रश्मी गोखले यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधताना उपयोगात आणलेली कौशल्ये आणि त्यांचा आजच्या कॉर्पोरेट जगातील संबंध याविषयी माहिती दिली तसेच "जलदुर्गांची साखळी - कौशल्यांची मांदियाळी" या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांनी विविध जलदुर्ग बांधताना किंवा त्यांचा जिर्णोद्धार करताना अनेक कौशल्यांची सांगड घातली  तसेच ही कौशल्ये आजच्या कॉर्पोरेट जगतातला उपयोग आणि वर्तमान काळाशी असलेला संबंध, याविषयीचे विवेचन या पुस्तकात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न देवदत्त व रश्मी गोखले हे करीत असून "जलदुर्गांची साखळी, कौशल्याची मांदियाळी" या पुस्तकामुळे युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, या पराक्रमाबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण, प्रशासन क्षमता, निर्दोष नियोजन कौशल्य आणि विलक्षण दृष्टी होती ते काळाच्या पुढे होते. त्यानी सदैव काळाच्या पलीकडे पाहिले असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी म्हटले कि, स्वराज्याच्या गडकिल्ल्यांवर इतकं प्रेम करणाऱ्या देवदत्त व रश्मी गोखले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून किल्ल्यांबाबत आपल्याला एक वेगळी दृष्टी दिली आहे तसेच शिवाजी महाराज हे फक्त युद्ध व लढायापुरतेच मर्यादित नसून एक कुशल प्रशासक, व्यवहारकुशल अर्थनीतीतज्ज्ञ, स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते, कुशल संघटक अशा अनेक गुणांनी संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते असे त्यांनी यावेळी म्हटले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. मुकुंद पाटील यांनी केले तर आभार प्रा. अमोल जोशी यांनी मानले.  

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश