Posts

Showing posts from August, 2024

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व महाविध्यालयात “राष्ट्रीय क्रीडा दिन” उत्साहात साजरा

Image
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा ; विविध खेळांचे आयोजन जळगाव , ता. २९ : सावखेडा परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी महाविदयालय येथे हॉकी या खेळाचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘ राष्ट्रीय क्रीडा दिन ’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि , मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. यश-अपयश पचवण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. चांगले आरोग्य हीच सर्वांची संपत्ती आहे हे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी दिवसभरातून किमान एक तास तरी खेळ खेळला पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या...

पालकांनी विध्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी त्यांचे “मानसिक आरोग्य” उत्तम कसे राहील यासाठी प्रयत्न करावे : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एमबीए , बीबीए व बीसीएची प्राध्यापक-पालक सभा संपन्न ; गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार जळगाव , ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए , बीबीए व बीसीए विभागाची प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सभेचे समन्वयक,विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील तसेच प्रा. कल्याणी नेवे यांनी आपल्या प्रास्ताविकेत पालक सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट करत महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , दैनंदिन जीवनात विद्यार्थी मानसिक तणावात आहेत या बाबीचा त्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर मोठा परिणाम होतोय या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम कसे राहील या...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगली चिमुकल्यांची "दहिहंडी"

Image
कृष्ण व राधा वेशभूषा स्पर्धेने आणली रंगत ; गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरी जळगाव , ता . २६ : ‘ गोविंदा आला … रे आला ’ च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत जी . एच . रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांनी दहिहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला . या प्रसंगी राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . सुरवातीला स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी राधा कृष्णच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली . शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण , गोपी - गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला . यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला . जी . एच . रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात . दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच राधांनी ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी”वर राष्ट्रीय परिषद संपन्न

Image
संशोधक, स्कॉलर विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग; भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत ९८ पेपर सादर जळगाव, ता.२४ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २३ रोजी “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील प्रा. डॉ. पूजा सिन्हा हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. माहिती तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मनुष्याचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी आपण विज्ञान – तंत्रज्ञानाचा अनुभव घेतोय. आधुनिक शास्त्रज्ञांनी तर मनुष्याला अज्ञात असणाऱ्या असंख्य गोष्टींवर अविरत संशोधन करून निसर्गातील अनेक अनाकलनीय पैलूंवर प्रक...

तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

Image
जळगाव, ता २२   : नुकतीच महाराष्ट्र शासन शालेय तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा जळगाव येथे पार पडली. स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकाऱ्यानी केले होते. या स्पर्धेमध्ये सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांनी भाग घेवून तालुक्यामध्ये विजय मिळविले आहे . १४ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- नीरव आकाश जैन, यश अमित हेमनानी, विहान संकित मुथा, विराज पिंकेश जैन, युग गौरव पांगरिया, (मुलीं)- आराध्या मनीष जैन, यशश्री राजकुमार मुनोत, तान्या प्रदीप छत्रानी, जान्या दिपक कुकरेजा, ध्रुवी अविनाश चौधरी तसेच १७ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- कलश कौशल मुंदडा, देशराज कीर्ती मुनोत, मिहीरसिंग जयप्रकाश मौर्य, ईदधंत निलेश काबरा, आर्ष सौरभ पाटन व १९ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- श्लोक चंदन महाजन, पृथ्वीराज प्रीतम मुनोत, वेदांत पंकज जंगले, मनन प्रशांत छाजेड,(मुली)- खादिजा मुर्तुजा लोखंडवाला, अनय मितेश पालोद, लाभी गौरव पांगरिया, कनक पवनकुमार सोनवणे या विध्यार्थ्याच्या संघाने विविध गटात विजेतेपद पटकाविले. स्कूलमध्ये विजयी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्क...

जग बदलतंय, उठा आपल्या स्वप्नांना कष्टाचे बळ द्या : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी . एच . रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न ; विविध बौद्धिक खेळांचे आयोजन जळगाव , ता . २१   –  महविद्यालयात विद्यार्थ्यांना घडविले जाते . त्यांच्यावर योग्य ते संस्कार घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्राध्यापक करीत असतात . त्यासोबतच विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य , व्यक्तिमत्व विकास , रोजगारभिमुक अभ्यास याचेही उत्तम ज्ञान आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे . ज्या विषयात शिक्षण घेत आहोत त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान विकसित करा . शिक्षण घेत असतांना प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो . आपण इतरांना फसवू शकतो परंतु स्वत : ला फसवू शकत नाही , त्यामुळे जीवनात सकारात्मकता , सत्यता , प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे नेहमी लक्षात ठेवा असे मत जी . एच . रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा . डॉ . प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले . ता. २१ बुधवार रोजी जी . एच . रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षा करिता अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विध्यार्थ्यांचा स्वागत...