पालकांनी विध्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी त्यांचे “मानसिक आरोग्य” उत्तम कसे राहील यासाठी प्रयत्न करावे : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एमबीए, बीबीए व बीसीएची प्राध्यापक-पालक सभा संपन्न ; गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार

जळगाव, ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए, बीबीए व बीसीए विभागाची प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सभेचे समन्वयक,विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील तसेच प्रा. कल्याणी नेवे यांनी आपल्या प्रास्ताविकेत पालक सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट करत महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, दैनंदिन जीवनात विद्यार्थी मानसिक तणावात आहेत या बाबीचा त्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर मोठा परिणाम होतोय या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी पालकांनी प्रयत्न करावे तसेच जी. एच. रायसोनी महाविध्यालयात मानसिक आरोग्य जपण्यासाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्राचा रोज अनेक विध्यार्थी लाभ घेतात. यासोबतच जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून विविध उद्योग केंद्रासोबत रायसोनी इस्टीट्युटने सामंजस्य करार केला आहे तसेच थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात. पालकांनीदेखील आपल्या मुलाच्या महाविध्यालयातील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तसेच त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पालकांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर-मायनर प्रोग्राम, अकॅडमीक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु झाल्याचे सांगत या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच प्राध्यापकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश - विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले तसेच विद्यार्थ्याने स्व:शिस्त अंगीकारावी कारण तुमच्या यशस्वीतेमागे शिस्तबद्धता सर्वात महत्वाची आहे. असा सल्ला देत उपस्थित पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे उत्तरे देत त्यांचे समाधान केले. सदर चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले. यावेळी एमबीए, बीबीए व बीसीए या विभागातील टॉप टेन गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या सभेचे प्रा. श्रिया कोगटा यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्रा. सरोज पाटील, डॉली मंधान, प्रतीक्षा जैन यासहीत सर्व प्राध्यापक व प्रध्यापकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले. सदर पालक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश