जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगली चिमुकल्यांची "दहिहंडी"
कृष्ण व राधा वेशभूषा स्पर्धेने आणली रंगत ; गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरी
सुरवातीला स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी राधा कृष्णच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण, गोपी-गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर, बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. ‘मुलांच्या
आतील साहस वाढवणे, एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहिहंडीचा उपक्रम राबविण्यात आला. राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा मुलांना समजावून देण्यात आल्या,’ असे मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी सांगितले. यावेळी निकिता जैन, वैशाली काळे, नेहा शिंपी आदी शिक्षकांनी मुलांचा उत्साह वाढवला. तसेच तीन थर रचून विद्यार्थ्यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.
राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेचा निकाल
सिनियर केजी : युविका लुल्ला, पर्व जैन, प्रयाण जैन, जियांश शमनानी, राजवीर मणियार, धैर्य मंडोरे, अनन्या शाह, शशांक कुंडू
ज्युनियर केजी : नीवा धूत, स्तुती सोनार, रादिया अमरेलीवाला, मिहिर करडा नर्सरी : कबीर कुकरेजा, मोहक काबरा, नव्या महाजन
प्ले ग्रुप : विदित बियाणी, धुर्व पाटील
ग्रेड १ ए : रायबा पाटील,ध्रुवी काबरा, अनय नाथानी, सान्वी रंगलानी, ओजल देसरडा
ग्रेड १ बी : कबीर मंत्री, जैनम गादिया, शरण्या निरज
ग्रेड २ : शिवांश आहुजा,युग सुराणा, अव्यान जैन,स्तुती मणियार, आव्या धिंग्रा
Comments
Post a Comment