तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
जळगाव, ता २२ : नुकतीच महाराष्ट्र शासन शालेय तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा जळगाव येथे पार पडली. स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकाऱ्यानी केले होते.
या स्पर्धेमध्ये
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांनी भाग घेवून तालुक्यामध्ये
विजय मिळविले आहे . १४ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- नीरव आकाश जैन, यश अमित
हेमनानी, विहान संकित मुथा, विराज पिंकेश जैन, युग गौरव पांगरिया, (मुलीं)- आराध्या
मनीष जैन, यशश्री राजकुमार मुनोत, तान्या प्रदीप छत्रानी, जान्या दिपक कुकरेजा, ध्रुवी
अविनाश चौधरी तसेच १७ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- कलश कौशल मुंदडा, देशराज
कीर्ती मुनोत, मिहीरसिंग जयप्रकाश मौर्य, ईदधंत निलेश काबरा, आर्ष सौरभ पाटन व १९ वर्षा
खालिल विजयी विद्यार्थी (मुले)- श्लोक चंदन महाजन, पृथ्वीराज प्रीतम मुनोत, वेदांत
पंकज जंगले, मनन प्रशांत छाजेड,(मुली)- खादिजा मुर्तुजा लोखंडवाला, अनय मितेश पालोद,
लाभी गौरव पांगरिया, कनक पवनकुमार सोनवणे या विध्यार्थ्याच्या संघाने विविध गटात विजेतेपद
पटकाविले. स्कूलमध्ये विजयी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या
मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा
सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका
तेजल ओझा यांनी नमूद केले कि, या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये
असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षक गौरव शिरसाळे
तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक दीपिका ठाकूर या क्रीडा शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम
मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे तसेच विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर
मारलेली मजल ही खरंच वाखाण्याजोगी असून विध्यार्थानी या यशाने भारावून न जाता राज्य
व राष्ट्रीय स्तरावर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा डंका कसा गाजवता येईल, याची आखणी
सुरू करावी असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही
महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा
व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांचे
या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment