छत्रपती शिवाजी महाराज हे 'आदर्श व्यवस्थापन गुरू' – शिव व्याख्याते हर्षल पाटील
.jpeg)
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ; मराठमोळ्या संस्कृतीचे घडले दर्शन तसेच ‘छत्रपती शिवाजी’ या सजीव देखाव्याने भारावले विध्यार्थी जळगाव , ता. ३० : पारंपारिक वेशभूषा केलेले असंख्य विद्यार्थी , महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले असंख्य भगवे झेंडे , शिवरायांच्या पराक्रमाची गीते , जय शिवराय या गगनभेदी घोषणां आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात गुरुवार ता. २८ रोजी तिथीनुसार शिवजयंती सोहोळा उत्साहात साजरा करण्यात आला. महाराजांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक शिवव्याख्याते हर्षल पाटील यासह प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना म्हटले कि , छत्रपती शिवाजी महाराज ह...