जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाउस “जीके क्विज” स्पर्धेचे आयोजन


जळगाव, ता. २० : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. याच अनुषगाने प्राथमिक विभागात इंटर हाउस जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ही स्पर्धा नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजी या तीन गटात विभागण्यात आली. यावेळी विविध गटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध स्तरावर पारितोषिके पटकावली. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, शालेय विध्यार्थ्यांचे कुतूहल जागृत करण्यासाठी जीके क्विजया स्पर्धांसारखे उपक्रम अत्यंत महत्वाची भुमिका बजावतात तसेच बऱ्याच पातळीवर यश मिळवण्यासाठी व्यापक ज्ञानाचा आधार हा महत्त्वाचा असतो म्हणजेच आजच्या प्रवाहात यश मिळविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (जीके) हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्वत:चे ज्ञान  विकसित करण्यास ते मदत करते. तसेच मोठे झाल्यावर त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वाढतो. वर्गातील अभ्यासक्रमाच्या पलीकडे असलेले ज्ञान विध्यार्थ्यांना नंतर त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यास मदत करते. त्यामुळेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये जनरल नॉलेज हा विषय अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही वर्षभर असे उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्कूलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले तर सदर स्पर्धेचे  यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयस रायसोनी यांनी अभिनंदन केले.



स्पर्धेचा निकाल

नर्सरी   दीआ गौरव बोथरा , ओजस्वी मिहीर महाजन, स्तुती विनोद सोनार, संमवेग अमित सांखला, गर्वित अजित काळे

नर्सरी बी  सिया तुषार विसावे, विधी वैभव शिरतुरे, ध्वनी अमित मंडोरे, धनवी राहुल तोडा

ज्यु. केजी ” – ग्रीषा आशिष श्री, मनवा वैभव पाटील, मुक्तिका हरगोपाल रायला, पृथवी पूरब बंग, रेविका महेश सोनी, गुणवीरसिंग सज्जनसिंग चव्हाण

ज्यु. केजी बी” – संस्कृती बापूसाहेब पाटील, माही पियुष संघवी, मारिया मुर्तझा अमरेलीवाला, युविका रॉबिन लुल्ला, सारा सौरभ लोढा, वीरा अमित शर्मा

सी. केजी ” – अनय आशिष नाथानी, इरा निरंजन देशमुख, प्रियांश स्वप्नील वंजारी, अर्ना संकेत पाटील, शिवांश महेश नाईक, सान्वी दीप रंगलानी

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश