जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्रसिद्ध गायक अमेय दातेंची लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट

छैया छैया... अन् चक दे इंडिया ... या अमेय दातेच्या रॉक ओंन नाईटने रायसोनीयन मंत्रमुग्ध ; महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी पार पडला सोहळा

जळगाव, ता. २८ : प्रसिद्ध गायक अमेय दाते तसेच जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी रॉक ओंन नाईट हा कार्यक्रम पार पडला. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अमेय दाते येणार म्हणून हजारो कॉलेज तरूण- तरूणींची गर्दी झाली होती. जी. एच. रायसोनी स्पोर्ट अ‍ॅन्ड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेय दातेच्या आगमनानंतर तरूणाईने एकच जल्लोष केला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती देत सांगितले कि विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध उपक्रम राबवीत असते, महाविद्यालयाच्या परिसरात सांस्कृतिक कलागुणांचा वावर आहे आणि कल्चरल क्लब त्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि याच माध्यमातून आजचा रॉक ओंन नाईट हा प्रसिद्ध गायक अमेय दातेच्या गीतांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या माध्यामातून विध्यार्थ्यांना अभ्यासातून थोडी उसंत मिळेल यात शंका नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

है प्रीत जहाँ की रीत सदा

मैं गीत वहाँ के गाता हूँ

भारत का रहने वाला हूँ

भारत की बात सुनाता हूँ

अशा हृदयाचा अचूक ठाव घेणाऱ्या देशगीतांसह तू ही रे तू ही रे तेरे बिना मैं...या गाण्यांची जादुई मैफल जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थी रसिकांना कैद करणारी ठरली. या रॉक ओंन नाईट महोत्सवाने अक्षरश: स्तब्ध केले. सायंकाळच्या शीतल वाऱ्याच्या साक्षीने चढत गेलेला स्वरांचा उबदार साज रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. जगविख्यात गायक अमेय दाते यांचा हा लाइव्ह कॉन्सर्ट संस्मरणीय झाला. जागतिक उंचीवर असूनही रसिकांशी संवाद साधत स्वरांची संगत करणाऱ्या अमेय दाते यांनी आपल्या शैलीने रसिकांना जिंकले

जीव रंगलाचा मराठमोळा साज....

या मराठमोळ्या गाण्याने शेवटाकडे गेलेली मैफल अधिक रंगतदार झाली. बॉम्बेचे तू ही रे तू ही रेही फर्माईश दिल खुश करणारी झाली. रसिकांची अप्रतिम फर्माईश आणि ती तितक्याच साधेपणाने पूर्ण करण्याचे त्यांचे मोठेपण हे देखील सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. अशातच एक युवक विध्यार्थी स्वरमंचाकडे धावला अन् झिंगाटगाण्यास भाग पाडले. अमेय दाते यांनीही तेवढ्याच मोठेपणाने त्याला प्रतिसाद दिला.

पांढरे जॅकेट, डोळ्यावर काळा गॉगल ...

अमेय दाते यांचे खास पांढरे जॅकेट, डोळ्यावर काळा गॉगल अन् रॉक ओंन अंदाजातील पोशाखात स्वरमंचावर आलेल्या अमेय दाते यांना पाहताच रसिकांतून एकच जल्लोष झाला. औपचारिकता आटोपताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी गाण्याला सुरुवात केली. खर्जातून तार सप्तकापर्यंत जाणारा त्यांचा आवाज, आरोह-अवरोहांशी ते करत असलेली नजाकत अन् आवर्तने घेत समेवर पोहोचण्याचे त्यांचे कौशल्य हृदय काबीज करणारे होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश