जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या “टेक्नोरीओन -२०२४” या तांत्रिक स्पर्धेला उदंड प्रतिसाद

तांत्रिक कलांचा आविष्कार ; विविध महाविद्यालयातील ३९२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच ५१ हजार रकमेची रोख पारितोषिके वितरीत

जळगाव, ता. १६ : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या टेक्नोरीओन २०२४हा उपक्रम जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ता. १६ मार्च शनिवार रोजी या राष्ट्रीय स्तरावरील टेक्नोरीओनया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे स्वयंसंशोधीत नवनविन उपकरणांचे मॉडेल्स, प्रोजेक्‍ट एक्झ‌िक्यूशन व रोबोटीक्स याचे प्रमुख आकर्षण होते. रायसोनी महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे यंदाही टेक्नोरीओन हा इव्हेंट घेण्यात आला असून यामध्ये १५ च्यावर अभ‌ियांत्रिकी महाविद्यालयातून ३९२ हून अध‌िक विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष कल्याणसिंग पाटील, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी टेक्नोरीओन २०२४ या उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सांगितले कि, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या उपक्रमाचे सलग सोळा वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात येत आहे तसेच कॉलेज म्हटलं की धम्माल-मस्ती ही आलीच. परंतु या धम्माल मस्तीला जर कॉलेजिअन्सच्या स्‍मार्ट अॅटीट्यूडची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे. सध्या इन्फॉरमेशन अन् टेक्नोलॉजीचे वारे अभियांत्रिकीच्या जगात घुमत आहे. आणि याच अनुषंगाने रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि एम्बेडेड सिस्टम, प्रोग्रामिंग आणि मेकॅट्रॉनिक्समध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते श्री. कल्याणसिंग पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, विध्यार्थ्यानो कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा तेव्हाच तुम्ही जीवनात यशाचे शिखर गाठू शकाल धैर्याने पाऊल उचलत चला. बंडखोरी वृत्ती जागवा आणि आपल्या कम्फर्ट झोनचा विस्तार करत पुढे जा. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुमचे यश त्या कक्षांना कधीही भेदू शकणार नाही. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या भिंती पाडाव्याच लागतील आणि जीवनात यश शिखर गाठावे लागेल असे मत व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञानाने केळी शेती कशी करावी यांचे विविध उदाहरणाद्वारे अनुभव कथन केले. या उपक्रमासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, प्रा. तुषार वाघ व प्रा. रफिक शेख या महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

 

तांत्रिक कलांचा आविष्कार टेक्नोरीओन

या इव्हेन्ट दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रोफेशनल आयुष्यात ज्या गोष्‍टींना सामोरे जायचे आहे त्याच अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात कनस्ट्रक्टो, कॅडेनजर, टेक्नोप्रीनर, आयडीयाथॅान, पायथॅान चॅम्प, रोबोरेस, सर्किट मिनिया तसेच इ.गेमिंग या विविध स्वरूपाच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या. तसेच रोबोरेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या रोबोमध्ये एका लाकडी ट्रॅकवर रेस लावण्यात आली.

 

या विध्यार्थ्यानी मिळविले यश

ई गेमिंग या स्पर्धेत कांचन एन. पाटील, अक्षय भोई, भूषण भोई, जयेश भावसार, वकार पठाण, रुषिकेश गायके, आदित्य लांडगे, मयूर पाटील आणि भावेश पाटील, शुभम झोपे व निश्चय वाघ कॅडेनजर या स्पर्धेत चेतन वाणी, सचिन हिरामण अहिरे, वैष्णव चौधरी, विशाल भारत रुंगठा टेक्नोप्रीनर या स्पर्धेत ओजस्विनी किरण बोरसे, लुब्धा राजेंद्र चौधरी, रुपेश प्रदिप शिंदे, निलेश मगन पाटील सर्किट मिनिया या स्पर्धेत अमेय सुनील बाविस्कर, कांचन एन. पाटील पायथॅान चॅम्प या स्पर्धेत विशाल रुंगठा, लिपाक्षी बनपूरकर, मोक्षदा पाटील, श्रेयांश दीक्षित, आयडीयाथॅान या स्पर्धेत वैष्णव चौधरी व विशाल भारत रुंगठा तसेच रोबोरेस स्पर्धेत भूपेश विजयकुमार पाटील व प्रणव चंद्रशेखर पाटील या विध्यार्थ्यानी पारितोषिके पटकावली

 


जैन इरिगेशनची केळीआधुनिक शेतीतील अविष्कार

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट येथे आयोजित टेक्नोरीओन -२०२४तील प्रमुख वक्ते म्हणून सहभागी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ कल्याणसिंग पाटील यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना केळी उत्पादनाच्या काही टिप्स देत नमूद केले कि, जागतिक स्तरावर केळीला अन्नघटकांपैकी महत्त्वाचे मानले जाते. प्रवासामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि खाता येणारे सुरक्षित असे फळ आहे. केळी पिकाच्या विकासासाठी गेल्या तीस वर्षापासून जैन इरिगेशन संशोधनात्मक कार्य करीत आहे. जैन इरिगेशनच्या पायाभूत केळीच्या विकासाच्या कार्यामुळे देशातून केळी ची उत्पादकता तीन पटीने वाढली तर कालावधी निम्मे झाला. निर्यातक्षम गुणवत्तेचे ग्रँड नैन टिश्युकल्चर म्हणजे देशातील केळी उत्पादकांना दिलेली एक अनोखी भेट आहे. ठिबक व फर्टीगेशन मुळे केळीची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. त्यामुळे आज आपल्याकडे केळीची मोठी निर्यात होत आहे. बागायदारांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी केळीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने जैन इरिगेशनचे अनमोल असे सहकार्य असल्याचेही के. बी. पाटील म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश