जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध‎ स्पर्धांचे बक्षीस वितरण‎ सोहळा उत्साहात संपन्न

अ‍ॅचिव्हर्स चषक, मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव ; विध्यार्थ्यांचा जल्लोष

जळगाव, ता. २२ : जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील ी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक आंतरशालेय विविध स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मेडल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. या सांघिक खेळातील विजयी संघाना अ‍ॅचिव्हर्स चषकव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ावेळी व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेंद्र पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने, प्रा. तन्मय भाले, अॅकडमिक डीन लीना त्रिपाठी व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्याचे आणि भारत देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निकिता जोशी तर आभार प्रदर्शन अल्फिया लेहरी यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे  यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश