जी. एच. रायसोनी महाविद्यालयात युवा महोत्सव “अंतराग्नी”ची धूम
स्नेहसंमेलनात विध्यार्थ्यांचा कलाविष्कार ; ५०० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
जळगाव, ता. २६ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “अंतराग्नी-२०२४” या शीर्षकाखाली सुरु झालेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा आज ता. २६ मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी फीत कापून केले या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभांसह कलागुणांना वाव मिळत असुन त्यांच्या सुप्त गुणांसह मानसिक, बौद्धिक तथा शारीरिक विकास साध्य होतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहेत. शिक्षणासोबतच कलागुणांना वाव देणाऱ्या संधी मिळाल्यास विद्यार्थी हे बौद्धिक, मानसिक व शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाचा व देशाचा आधारस्तंभ होतील. विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घड़विने हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. असे म्हणत त्यांनी या स्नेह संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाची माहिती दिली तसेच विध्यार्थ्यांना यावेळी विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यानंतर अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी म्हटले कि, स्नेहसंमेलनाचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे हा असतो. स्नेहसंमेलनात संस्कृती व ऐतिहासिक कार्यक्रमाची झलक सादर होत असल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. ता.२६ मार्च ते २८ मार्च दरम्यान आयोजित या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये नृत्य, गीत गायन, डिपार्टमेंट वॉर, पर्सनालिटी कॉन्स्टटे, दुसऱ्या दिवशी डे सेलिब्रेशन व तिसऱ्या दिवशी शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यानी मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीते विध्यार्थी स्पर्धकांनी सादर केली तसेच प्रेक्षक विद्यार्थ्यांनी विविध गीतांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी अंतराग्नीचे विशेष आकर्षण ठरले “संभाजी महाराजांची आहुती” व “अफजल खानाचा वद” हा पोवाडा. पोवाड्याच्या थरारक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेकाक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी परीक्षक म्हणून प्रा.अनिल सोनार, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. अर्चना महाजन, प्रा. नरेंद्र महाजन, प्रा. धनेश पाटील, प्रा. गौरव धाडसे तर प्रा. स्वाती पाटील यांनी काम पाहिले. तर स्नेहसंमेलनासाठी प्रा. वसिम पटेल यांनी समन्वयकाची भूमिका बजावली तसेच विवेक पाटील या विध्यार्थ्याने सूत्रसंचालन केले.
आज प्रसिद्ध गायक अमेय दाते प्रमुख आकर्षण ; सूरमयी संध्याकाळसाठी महाविध्यालय सज्ज
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या “अंतराग्नी-२०२४” या शीर्षकाखाली सुरु झालेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ता. २७ बुधवार रोजी 5.30 वाजता जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात होणा-या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल फेम अमेय दाते हे राहणार असून हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम ते यावेळी सादर करणार आहे. त्यामुळे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांना एका आंतरराष्ट्रीय गायकांची मैफिल मोठी पर्वणीच ठरणार आहे.
Comments
Post a Comment