जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी
सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ; संगणक अभियांत्रिकी विभागाचे विध्यार्थी प्रथम जळगाव, ता.३१ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देश एकसंध रहावा म्हणून सरदार पटेल यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते अत्यंत कणखरपणे काही भूमिका घेतल्यामुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते. सरदार पटेल यांचे देशप्रेम, धैर्य, दूरदृष्टी, कणखरपणा निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेले निर्णय राबवण्याची धमक या गुणांमुळे सरदार पटेल यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरले असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमा...