जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

 सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ; संगणक अभियांत्रिकी विभागाचे विध्यार्थी प्रथम 

जळगाव, ता.३१ :  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देश एकसंध रहावा म्हणून सरदार पटेल यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते अत्यंत कणखरपणे काही भूमिका घेतल्यामुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते. सरदार पटेल यांचे देशप्रेम, धैर्य, दूरदृष्टी, कणखरपणा निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेले निर्णय राबवण्याची धमक या गुणांमुळे सरदार पटेल यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरले असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात कला, वक्तृत्व, गायन व इ. प्रकारामध्ये समुह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात संगणक अभियांत्रिकीच्या यश्रय पाटील, स्वप्निल श्रावणे, शिवानी देशपांडे, भावेश कन्हैया, दिशा सूर्यवंशी, वंदना जांगेड, श्रावणी कासार या विध्यार्थ्यानी प्रथम बाजी मारत आपली चुणूक दाखवली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वसीम पटेल यांनी तर सूत्रंसचालन आणि आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी केले. यावेळी स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी बीबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील,संगणक विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील प्रा. श्रेया कोगटा यांनी पार पाडली तर यावेळी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, रजिस्टार अरुण पाटील यासह प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश